गृहप्रकल्पाच्या खड्डयात पडून मजुराचा मृत्यू

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

तळजाई परिसरातील घटना; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – गृहप्रकल्पाच्या खड्डयात पडून मजुराचा मृत्यू – नियोजित गृहप्रकल्पाच्या खड्डयात पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना तळजाई परिसरात घडली. मजुराला सुरक्षाविषयक साधने न पुरविता दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विधी महाविद्यालयात रस्त्यावर घरपोडी – सविस्तर बातमी

प्रसाद अशोक जाधव (वय २७) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदार गणेश नामदेव जागडे (वय ३९, रा. वडगाव खुर्द, सिंहगड रस्ता ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस हवालदार संदीप चव्हाण यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडी भागातील तळजाई पठार परिसरात एका गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. तेथे खोदलेल्या खड्ड्यात पडून बांधकाम मजूर जाधव गंभीर जखमी झाला. २४ जुलै रोजी ही घटना घडली होती. उपचारादरम्यान जाधव याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बांधकाम मजुराला पुरेशी सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याने गंभीर दुर्घटना घडल्याचे पोलीस चौकशीत उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार डी. व्ही. धोत्रे तपास करत आहेत.

वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार; खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा

पुणे – गृहप्रकल्पाच्या खड्डयात पडून मजुराचा मृत्यू – वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुण्यात आल्याची घटना कात्रज भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी टोळक्याविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ओंकार राजेंद्र दानवले (वय १९, रा. ओव्हाळ वाडा, कात्रज गाव) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सोहम धुमाळ, संकेत रेणुसे यांच्यासह आठ जणांविरुद्ध गु्न्हा दाखळ करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दानवले याची धुमाळ, रेणुसे यांच्याशी भांडणे झाली होती. २९ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास दानवले आणि त्याचा मित्र दुचाकीवरुन कात्रजमधील जैन मंदिराजवळून निघाले होता.

त्या वेळी आरोापी धुमाळ, रेणुसे यांच्यासह साषीदारांनी दुचाकीस्वार दानवले आणि मित्राला अडवून शिवीगाळ केली. टोळक्याने दोघांना मारहाण केली, तसेच दानवले याच्याबरोबर असलेल्या मित्राच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत दानवले याचा मित्र गंभीर जखमी झाला.पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×