Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

विधी महाविद्यालय रस्त्यावर घरफोडी

पुण्यात मद्यधुंद तरुणांची ‘गाडीत' हुल्लडबाजी

ज्येष्ठाच्या सदनिकेतून पावणेपाच लाखांचा ऐवज चोरीला

marathinews24.com

पुणे – विधी महाविद्यालय रस्त्यावर घरफोडी – शहर परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. विधी महाविद्यालय रस्त्यावर असलेल्या एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद; युनिट एकची कारवाई – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे विधी महाविद्यालय रस्त्यावरील शांतीलिला सोसायटीत राहायला आहेत. २९ जुलै रोजी मध्यरात्री चोरटे सोसायटीत शिरले. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील चांदीच्या वस्तू, कॅमेरा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण साठविणारे ‘डीव्हीआर’ यंत्र लांबविले. बुधवारी (३० जुलै) सायंकाळी ज्येष्ठ नागरिक घरी परतले. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आले. त्यानंतर या घटनेची माहिती पाेलिसांना कळविण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक चांदणी शेंडे तपास करत आहेत.

विश्रांतवाडीत एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी मोबाइल, मनगटी घड्याळे असा २९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अहे. तक्रारदार महिला टिंगरेगनर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या १२ जुलै रोजी नागपूरला गेल्या होत्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील दोन मोबाइल, मनगटी घड्याळे असा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक लाखे तपास करत आहेत.

घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी नवी पेठेतील लोकमान्यनगर परिसरात ज्येष्ठ महिला राहत असलेल्य सदनिकेचे कुलूप तोडून साडेसात लाख रुपयांचा ऐवज लांबविला होता. विश्रांतवाडी, वारजे माळवाडी भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १९ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना नुकतीच घडली. ज्या सोसायटीत रखवालदार नाहीत. अशा सदनिकांची पाहणी करुन चोरटे ऐवज लांबवितात, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कामनिमित्त अनेकजण सकाळी सदनिका बंद करुन बाहेर पडतात. भरदिवसा घरफोडी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे वसाहतीत रेल्वे कर्मचाऱ्याच्या घरातून चोरट्यंनी चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली होती. घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपनगरात गस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच घरफोडी करणाऱ्या सराइतांची चौकशी करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×