भरदिवसा वारजेत दुचाकीस्वार दाम्पत्याला लुटले
marathinews24.com
पुणे – रस्त्यावर तपासणी सुरू आहे, तुमचे दागिने काढून ठेवा… दुचाकीस्वार दाम्पत्याचा पाठलाग करून चोरट्यांनी त्यांना अडविले. रस्त्यावर तपासणी सुरू आहे, तुमचे दागिने काढून बॅगमध्ये ठेवा, असे सांगून हातचलाखीने चोरट्यांनी दाम्पत्याकडील १ लाख ४० हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना १० जूनला सकाळी सव्वा दहाच्या सुमारास वारजेतील हरिभाउ पाटील चौधरी चौकात घडली आहे. याप्रकरणी कोथरूड डेपो परिसरात राहणार्या ५८ वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मित्राचा खून केला अन पळून जाण्याचा डाव फसला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि त्यांचा पती १० ऑगस्टला सकाळी सव्वा दहाच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. वारजेतील हरिभाउ पाटील चौधरी चौकात दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांना गाठले. दुचाकी आडवी उभी करून, चोरट्यांनी दाम्पत्याला रस्त्यावर पुढे तपासणी सुरू आहे. तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा असे सांगितले. त्यानुसार महिलेने १ लाख ४० हजार रूपयांचे सोन्याचे मंगळसूत्र काढून पिशवीत ठेवले. त्यानंतर दोघा चोरट्यांनी दाम्पत्याला बोलण्यात गुंतवून हातचलाखी केली. त्यांच्याकडील पिशवी घेउन चोरट्यांनी मंगळसूत्र चोरून नेले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिरोळे तपास करीत आहेत.
बालाजीनगरात महिलेचे ७५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावले
रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी तिच्या गळ्यातील ७५ हजारांचे सोन्याचे मंंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना १० जूनला सकाळी सव्वा सहाच्या सुमारास बालाजीनगरात घडली आहे. याप्रकरणी धनकवडीत राहणार्या ५४ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघा दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धनकवडीत राहायला असून, १० जूनला सकाळी सहाच्या सुमारास बालाजीनगरातून पायी जात होती. त्यावेळी दुचाकीस्वार दोघा चोरट्यांनी महिलेला रंगोली साडी सेंटरजवळ गाठले. त्यांच्या गळ्यातील ७५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे सुसाट पसार झाले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे वेगाने निघून गेले. याप्रकरणी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत.























