Breking News
“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेखजिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्या

10 मीटर एअर रायफल स्पर्धेत हरियाणाच्या दीपक सैनीला सुवर्ण पदक

10 मीटर एअर रायफल स्पर्धेत हरियाणाच्या दीपक सैनीला सुवर्ण पदक

एजीसी स्पोर्टस पॅरा खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ दिवस सातवा

marathinews24.com

पुणे – श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे सुरू असलेल्या एजीसी स्पोर्टस  पॅरा एडिशन २०२५ मध्ये रविवारी झालेल्या पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग (SH1) स्पर्धेत हरियाणाच्या दीपक सैनीने सुवर्ण पदकाची कमाई केली. तसेच या स्पर्धेत कर्नाटकाच्या राकेश एन. निदागुंडी याने रौप्य पदक तर कर्नाटकाच्याच सचिन सिद्दन्नावर याने कांस्य पदक पटकावले. विशेष म्हणजे शेवटच्या फेरीपर्यंत अंतिम सामना चुरशीचा रंगला होता. यात हरियाणाच्या दीपक सैनीने अफलातून नेमबाजी करत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले.

नचिकेत मेहेंदळे यांच्या ‘चक्रधार’ पुस्तकाचे प्रकाशन – सविस्तर बातमी 

११ ऑगस्टपासून सुरू झालेली एजीसी स्पोर्टस  पॅरा एडिशन २०२५ ही स्पर्धा पॅरा ॲथलिट्सना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ ठरत आहे. विविध राज्यांतील पॅरा खेळाडू यात सहभागी झाले असून, त्यांच्या खेळातील जिद्दीमुळे स्पर्धेला वेगळाच रंग आला आहे. या स्पर्धेचा समारोप उद्या, १८ ऑगस्ट रोजी होणार असून विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे अंतिम सामने पाहण्यासाठी जास्तीत जास्त पुणेकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×