Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

सॉरी बोल, नाहीतर तुझ्यासह कुटुंबाला गोळ्या घालून मारू

पुण्यातील फिटनेस ट्रेनरला कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगकडून धमकी

marathinews24.com

पुणे – शहरातील फिटनेस ट्रेनरला बॉडी बिल्डिंग क्षेत्रात बदनाम करण्याच्या दृष्टीने सोशल मीडियावर शिवीगाळ करून ‘सॉरी बोल, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला गोळ्या घालून मारून टाकू,’ अशी जिवे मारण्याची धमकी कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. भास्कर शहा, नरेश चौधरी आणि करण (तिघेही रा. दिल्ली) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. धानोरीत राहणार्‍या फिटनेस ट्रेनरने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

शिवाजीनगर परिसरात बसमध्ये शिरताना जेष्ठेचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी

तक्रारदार हे धानोरी परिसरात राहण्यास असून, ते मुळचे हरियाणामधील आहेत.ते ६ वर्षे बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसचे ऑनलाइन ट्रेनिंग देतात. यासाठी त्यांच्या नावाने इन्स्टाग्राम, यू ट्यूब व फेसबुकवर अकाउट आहे. याच माध्यमातून त्यांची आरोपी भास्कर शहा याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर ६ जून २०२५ रोजी तक्रारदारांना नरेश चौधरी नावाच्या आरोपीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यानंतर तक्रारदारांनी त्यांची रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्याने तक्रारदारांना भास्कर शहा आणि करण यांच्यासोबत दिल्लीत पेइंगगेस्ट म्हणून राहत असल्याचे सांगितले. तसेच, भास्कर शहा आणि करण हे दारू पिऊन त्रास देत असल्याचे व्हिडीओ तक्रारदारांच्या इन्स्टाला व स्वतःच्या इन्स्टाला पोस्ट केले होते. दि. ८ जून रोजी नरेश आणि करण यांनी त्यांच्या इन्स्टावरील पोस्ट डिलीट केली.

तक्रारदारांना त्यांच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट डिलीट करण्यास सांगितले. परंतु, तक्रारदार यांनी ती पोस्ट डिलीट केली नसल्याने ती पोस्ट डिलीट करण्यासाठी भास्कर शहा, करण व नरेश हे तक्रारदारांना वारंवार फोनद्वारे धमकी देत होते. ती पोस्ट डिलीट केली नाही म्हणून ९ जून रोजी व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून त्यांना बिष्णोई गँगमधून बोलत असल्याचा कॉल आला. तो व्हिडीओ तत्काळ काढून टाक म्हणत शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान, दि. २ जुलै रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने कॉल करून मी लॉरेन्स बिष्णोई गँगमधून काला शूटर बोलत असल्याचे सांगून भास्कर शहाला ‘सॉरी बोल, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला गोळ्या घालून मारून टाकू,’ अशी धमकी दिली. यामुळे तक्रारदाराच्या कुटुंबावर प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×