Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

मेफेड्रॉनची तस्करी करणार्‍या राजस्थानीला अटक, २५ ग्रॅम एमडी जप्त

प्रार्थनेतून कर्करोग बरा करण्याचा दावा

पुणे कस्टमची कारवाई

marathinews24.com

पुणे – सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम विभाग) अमली पदार्थविरोधी सेलने राजस्थानच्या रहिवाशाला मेफेड्रॉन तस्करीप्रकरणी अटक केली. त्यांच्याकडून लाखो रुपयांचे २५ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. दिनेश चौधरी (रा. जयपूर, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री अमली पदार्थविरोधी सेलला माहिती मिळाली की, दिनेश चौधरी शिक्रापूरहून धनकवडीकडे अमली पदार्थ घेऊन जाणार आहे. तसेच, रात्री साडेअकरा वाजता वाडिया कॉलेजसमोर जीएसटी भवनाजवळ एमडी ड्रग घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती.

सॉरी बोल, नाहीतर तुझ्यासह कुटुंबाला गोळ्या घालून मारू – सविस्तर बातमी

अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी महेंद्र पांचाल, सोनू कुमार, चेतन महाजन आणि विकास तिवारी यांनी पथक तयार करून सापळा रचला. रात्री साधारणत: साडेअकरा वाजता एक कार तेथे आली. रेसिडेन्सी क्लब सिग्नलजवळ वाहन अडवून तपासणी करण्यात आली. यावेळी कारमध्ये काहीही मिळाले नाही. मात्र, आरोपी दिनेश चौधरीची झडती घेतल्यावर त्याच्याकडे दोन पारदर्शक पिशव्यांत पांढऱ्या पावडर स्वरूपातील पदार्थ सापडला. चौकशीत त्याने हा एमडी ड्रग असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २५ ग्रॅम एमडी आणि २० हजार ३०० रुपये रोख जप्त करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकील ऋषिराज वालवेकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. युक्तिवादानंतर आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×