Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

एमआयडीसी परिसरात वाहने नियोजित जागेवरच पार्किंग करावी-अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार

एमआयडीसी परिसरात वाहने नियोजित जागेवरच पार्किंग करावी-अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार

 वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन सहकार्य करावे

marathinews24.com

बारामती – महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आवारातील वाहने नियोजित जागेवरच वाहने पार्कींग करावी, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, नियमांंचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करावी, असे निर्देश अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिले.

नव्या काळातील बदल स्विकारणारी पिढी एमकेसीएलने घडवावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी 

बारामती विमानतळ ते पेन्सिल चौक एमआयडीसी आवारातील रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंग समस्या आणि उपयोजनांबाबत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मंगळवारी (दि.१९) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर दुरदृष्यप्रणालीद्वारे) प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम उपस्थित होते.

बिरादार म्हणाले, वाहतुक सुरक्षा विषयक नियमाबाबत माहिती देण्यासह वाहन धारकांची बैठक आयोजन करावे. वाहने रस्त्यांवर उभे करु नये याबाबत चालकास सुचना एमआयडीसी आणि कंपनीने सूचना घ्याव्यात. वाहतूक सुरक्षितेच्या नियमाचे पालन करावे असे सर्व कंपनीतील कर्मचारी व अधिकारी यांना माहिती देण्यात यावी,असेही ते म्हणाले. तर नावडकर म्हणाले, ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूकीच्या अनुषंगाने सूचना केल्या, या सुचनाबाबत प्रशासनाच्यावतीने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे नावडकर म्हणाले.

पाटील म्हणाले, एमआयडीसी परिसरातील वाहतुक कोंडी सोडवण्याकरिता वाहन पार्किंगच्या अनुषंगाने नियोजन करण्यात येईल. वाहणकरिता टर्मिनल तयार करुन त्यावर वाहनाची पार्कींग करण्याबाबत कंपनीला सूचना देण्यात आल्या. वाहनांना पार्किंगकरिता पार्किंग यार्डची नेमून देण्यासह वाहन चालकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी सुचना त्यांनी केली. यावेळी वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, नायब तहसीलदार पी. डी. शिंदे, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष ऍड तुषार झेंडे पाटील, तालुका अध्यक्ष संजीव बोराटे, एमआयडीसी परिसरातील पॅजिओ कंपनी, गजानन ऍग्रो कंपनी, बारामती कॅटल फुड कंपनी, भारत फोर्ज कंपनी, मोरया गोदरेज व डायनामिक्स कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×