Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

खुशखबर…गणेशोत्सवानमित्त गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी

खुशखबर...गणेशोत्सवानमित्त गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी

गणेश भक्तांसाठी २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर कालावधीत सवलत 

marathinews24.com

पुणे – शासनाने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या गणेश भक्तांसाठी २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर कालावधीत त्यांच्या वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सवलत दिली आहे. या सवलतीसाठी गणेशभक्तांनी उद्यापासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवसाबरोबरच सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशीही वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहनचालकाची अनुज्ञप्ती, कर प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र व वाहतूक परवाना कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

१५० दिवसांचा कार्यक्रम प्रशासकीय मोहिम नसून जनतेशी जोडणारा सेतू -उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी 

गणेश भक्तांनी कागदपत्रे सादर केल्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालय, डॉ. आंबेडकर रोड, संगम ब्रिज जवळ, पुणे येथून कार्यालयीन वेळेत पथकरातून सूट मिळण्याचे पासेस त्यांना उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे अंतर्गत येणारे आळंदी रोड कार्यालय व दिवे कार्यालय येथेही कार्यालयीन वेळेत पासेस उपलब्ध करुन दिले जाणार आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×