वानवडी पोलिसांकडून दोघा सराईतांना अटक
marathinews24.com
पुणे – महिलांची कपडे घालून कंपनीत चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन आरोपींना वानवडी पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. त्यांच्याकडून २ लाख १९ हजार रुपये किंमतीचा तांब्याच्या वायर आणि पट्ट्यांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमन अजीम शेख (वय २४ रा. रामटेकडी, हडपसर) आणि मुसा अबू शेख (वय २४ रा. रामटेकडी, हडपसर) याप्रकरणी नारायण लक्ष्मण ढगे (रा. लोणी काळभोर) यांनी तक्रार दिली आहे.
कारागृहातून बाहेर आला अन गांजा विक्री करू लागला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची कपडे घातलेल्या दोघा जणांनी २६ ऑगस्टला कंपनीच्या खिडकीचा गज तोडून आत प्रवेश केला.एकाने पिवळा गाऊन आणि दुसऱ्याने गुलाबी सलवार कमीज घातले असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. चोरट्यांनी तोंडाला ओढणी व मास्क बांधून कंपनीतील रूममधून तांब्याचे वायर आणि पट्ट्यांचे रोल्स चोरून नेले होते. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला. चोरी करणारे हे आरोपी रेकॉर्डवरील असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तांब्याचे वायर रोल, बस बार पट्ट्या, गेज रोल, कॉइल्स, कॉइन्स आणि हार्ड डिस्क – असा २ लाख १९ हजार रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके, एपीआय उमाकांत महाडिक, पोलीस कर्मचारी महेश गाढवे, दया शेगर, अतुल गायकवाड, अमोल पिलाने, अमोल गायकवाड, अभी चव्हाण, गोपाळ मदने, विष्णू सुतार, बालाजी वाघमारे, यतीन भोसले, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे, अर्शद सय्यद यांनी केली.























