दुचाकीचा हॉर्न का वाजवल्याचा राग, कोंढव्यात तरूणावर वार

टोळक्याची तरुणाला फायटरने मारहाण

कोंढवा बुद्रूकमधील श्रद्धानगरातील घटना

marathinews24.com

पुणे – माझ्या एरियामध्ये हॉर्न वाजवायची तुझी हिंमत कशी झाली, अशी विचारणा करीत हल्लेखाराने तरूणावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. ही घटना २ सप्टेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास कोंढवा बुद्रूकमधील श्रद्धानगरात घडली आहे. याप्रकरणी येवलेवाडीत राहणार्‍या तरूणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार हल्लेखोराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहरात वेगवेगळ्या घटनेत दोघांवर वार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण येवलेवाडीत राहायला असून, २ सप्टेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास कोंढवा बुद्रूकमधील श्रद्धानगरात दुचाकी घेउन गेला होता. त्याठिकाणी सोमजी चौकात हल्लेखाराने दुचाकीस्वार तरूणाला अडवले. माझ्या एरियामध्ये तुझी हॉर्न वाजवायची हिंमत कशी झाली, अशी विचारणा त्याला शिवीगाळ केली. त्याच्यावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.

भांडणाच्या रागातून अल्पवयीनांनी तरूणावर केला वार; पाषाण परिसरातील घटना

पुणे – भांडणाच्या रागातून चार अल्पवयीनांनी तरूणावर वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी अल्पवयीन आरोपींना बाणेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना २ सप्टेंबरला रात्री पावणेअकराच्या सुमारास पाषाणमधील सुतारवाडी परिसरात घडली आहे. सचिन माने असे गंभीररित्या जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तरूणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि त्याचा मित्र २ सप्टेंबरला रात्री पावणेअकराच्या सुमारास पाषाणमधील सुतारवाडी परिसरात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या चौघा अल्पवयीन आरोपींनी जुन्या भांडणाचा वाद उकरून काढला. त्याच रागातून टोळक्याने सचिन माने याच्या हातावर आणि डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सानप तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×