शहरात वेगवेगळ्या घटनेत दोघांवर वार

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – शहरात वेगवेगळ्या भागात वादातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी बाणेर आणि कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. पाषाणमधील सुतारवाडी परिसरातून वैमनस्यातून एका तरुणावर टोळक्याने तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना मंगळवारी (२ सप्टेंबर) घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

कुख्यात आंदेकर टोळीला पिस्तुले पुरविल्याचा संशय – सविस्तर बातमी

ज्ञानेश्वर रखमाजी कडेकर (वय १९, रा. खेडेकर चाळ, सुतारवाडी, पाषाण) याने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात कडेकरचा मित्र सचिन कटप्पा माने जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडेकर आणि माने पाषाणमधील शिवसेना चौकात मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास जेवण करुन गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी टोळक्याने कडेकर आणि माने यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना दगड फेकून मारले. माने तेथून पळाला. आरोपीनी पाठलाग करुन माने याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पोलिसांनी पसार झालेल्या एका आरोपीला ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक सानपे तपास करत आहेत.

दुचाकीचा हाॅर्न वाजविल्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना काेंढवा भागात घडली. महादेव बभ्रुवान टोम्पे (वय ४१, रा. भराडे वस्ती, येवलेवाडी, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत टोम्पे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास टोम्पे येवलेवाडी भागातून निघाले होते. त्या वेळी आरोपीने हाॅर्न का वाजविला, अशी विचारणा करुन टोम्पे यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×