Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

कोणार्क सूर्य मंदिराचा वैभवशाली इतिहास जाणून धन्य झाले – डॉ. नीलम गोऱ्हे

कोणार्क सूर्य मंदिराचा वैभवशाली इतिहास जाणून धन्य झाले - डॉ. नीलम गोऱ्हे

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कोणार्क सूर्य मंदिराचे घेतले दर्शन

marathinews24.com

कोणार्क (ओडिशा)- विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सध्या ओडिशा दौऱ्यावर असून त्यांनी कोणार्क सूर्य मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्या इतिहास, शिल्पकला व सांस्कृतिक वारशाबाबत कौतुक केले. कोणार्क मंदिरातील हजारो शिल्प, प्रभात सूर्याचे अप्रतिम चित्रण, हत्तींची सुमारे दोन हजार शिल्पे आणि महिलांच्या, सामान्य जनतेच्या तसेच राज घराण्यांच्या जीवनाशी संबंधित शिल्पकला हे भारतीय संस्कृतीचे अनमोल वैभव आहे.”

सिरत कमिटीच्या वतीने हजरत महंमद पैगंबर यांची १५०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी – सविस्तर बातमी 

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले , १९०१ साली ब्रिटिशांच्या लक्षात आलेले हे मंदिर तेव्हा ‘पॅगोडा’ म्हणून ओळखले जात होते. नंतर त्याचे खरे स्वरूप समोर आले. १९८४ मध्ये भारत सरकारने या मंदिराचा संपूर्ण कारभार पुरातत्त्व विभागाकडे सोपविला. महाराष्ट्रातुन मराठा राजे ओरिसात आले तेंव्हा मंदिराची मोठ्या प्रमाणात भग्नावस्था झाल्याचे पाहुन कोणार्क मंदिरातील ‘अरुण स्तंभ’ त्यांनी जगन्नाथ पुरी येथे श्री जगन्नाथ मंदिरात हलविला होता असेही तेथील गाईडने आम्हाला सांगितले.

“आपल्या पूर्वजांनी केलेल्या या कर्तृत्वाचा अभ्यास इथल्या लोकांनी उत्तम रीतीने जपून ठेवला आहे. तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. तसेच आज आपण जे कार्य करत आहोत, त्याचा इतिहासात काय ठसा उमटणार आहे, याचाही विचार इथे आल्यावर मनात जागृत होतो,” असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी भारत सरकारच्या जी-२० परिषदेच्या वेळी या मंदिराचा घेतलेला संदर्भ व त्यातून परराष्ट्र संबंध दृढ करण्याच्या झालेल्या प्रयत्नांचाही उल्लेख केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×