Breking News
अल्पवयीन गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणणार-पोलीस आयुक्त अमितेश कुमारउच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रस्तावित कोचिंग क्लासेस नियमन कायदा करण्यापूर्वी राज्य सरकारने पीटीए शी संवाद साधावाउद्योजकतेला बळ, स्वावलंबनाला दिशा! – विशेष लेखपुणे व्यापाऱ्यांच्या जिएसटी प्रश्नांसाठी भाजपा व्यापारी आघाडीचा पुढाकारपुण्याच्या विकासात अपयशी ठरलेल्या ‘पीएमआरडीए’ला टाळे ठोकण्याची वेळभरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलतरोजगार महाकुंभ अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजनकात्रज-कोंढवा रोडवर भरधाव वाहनाने शाळकरी मुलींना उडवलेपुण्यात नशाखोरांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरलापोलिसांची केली बतावणी, जेष्ठाला ४८ लाखांचा ऑनलाईन गंडा

सदाबहार हिंदी चित्रपट गीतांच्या सान्निध्यात एक उनाड सायंकाळ..!

सदाबहार हिंदी चित्रपट गीतांच्या सान्निध्यात एक उनाड सायंकाळ..!

‘छायागीत’ कार्यक्रमाला रसिकांची भरभरून दाद

marathinews24.com

पुणे – किशोर कुमार, महंमद रफी, मन्ना डे, मुकेश, हेमंतकुमार, गीता दत्त, लता मंगेशकर, आशा भोसले, तलत मेहमुद या प्रसिद्ध गायकांनी लोकप्रिय केलेल्या अजरामर गीतांचा नजराणा हिंमत कुमार पंड्या, गितांजली जेधे या कलाकारांनी पुणेकर रसिकांसमोर पेश केला. तरुणांसह ज्येष्ठांनी जुन्या सदाबहार हिंदी गीतांचा आनंद घेत फर्माईशीतून खुलत गेलेल्या गाण्यांना टाळ्या-शिट्ट्यांनी मनमुराद दाद दिली. तर अनेक गाण्यांवर जेष्ठांनी गायकांच्या सुरात सुर मिसळत गायनाचा आनंद लुटला.

गदिमांप्रमाणे कोथरुडमध्ये सुधीर(बाबूजी) फडके यांच्या स्मारकाचा प्रस्ताव तयार करा! – सविस्तर बातमी 

पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे सोमवारी (दि. २१ जुलै) सायंकाळी लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस येथे ‘छायागीत’ या जुन्या हिंदी अवीट गोडीच्या गाण्यांची मैफल आयोजित करण्यात आली होती. तब्बल तीन तास रंगलेल्या या मैफलीत कलाकारांनी ४० पेक्षा जास्त गीते ऐकविली. कार्यक्रमाची सुरुवात गणेशस्तवनाने करण्यात आली.

‘जीवनसे भरी तेरी आँखे’, ‘लुटे कोई मन का नगर’, ‘ये रात भिगी भिगी’, ‘दिवाना हुआ बादल’, ‘कोरा कागज था’, ‘वो शाम कुछ अजिब थी’, ‘मै हु झुम झुम झुम झुमरू’, ‘मेरे मेहबुब ना जा’, ‘नखरेवाली’, ‘रूप तेरा मस्ताना’, ‘ओ मेरी जोहरा जबी’, ‘लग जा गले’, ‘जय जय शिवशंकर’, ‘याद किया दिल ने’, ‘बदन पे सितारे लपेटे हुऐ’, ‘शाम ए गम की कसम’, ‘तेरी आखों के सिवा’ अशी एकाहून एक लोकप्रिय गीते सादर करण्यात आली. ‘लागा चुनरिमे दाग’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हे गीत कार्यक्रमाचा कळसाध्याय ठरले. आपल्या समर्पक निवेदनाने अनुराधा भारती यांनी कार्यक्रमात रंग भरले.
कार्यक्रमाचे संयोजन किशोर सरपोतदार यांनी केले.

अजित कुमठेकर यांनी कार्यक्रमाची संकल्पना विशद केली. तर प्रास्ताविक प्रांजली गांधी यांनी केले. कलाकारांचा सत्कार मेलडी मेकर्सचे संस्थापक अशोककुमार सराफ, निवृत्त पोलिस अधिकारी चंद्रशेखर दैठणकर यांनी केला. सतिश देव, डॉ. रोहिणी काळे, डॉ. प्रसाद पिंपळखरे, आनंद सराफ, ॲड. मोहन शेटे, संत साहित्याचे अभ्यासक श्रीयुत तापकीर, डी. के. अभ्यंकर, समिर धर्माधिकारी, जमिर दरबार, श्रीधर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×