Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

गदिमांप्रमाणे कोथरुडमध्ये सुधीर(बाबूजी) फडके यांच्या स्मारकाचा प्रस्ताव तयार करा!

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची मनपा आयुक्तांना सूचना

marathinews24.com

पुणे – गदिमांप्रमाणे कोथरूड मध्ये सुधीर फडके अर्थात बाबूजींचे स्मारक उभारण्यासाठीचा प्रस्ताव तयार करा, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी महापालिका आयुक्तांना केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा – सविस्तर बातमी

पुणे महानगरपालिकेच्या वतीने गीतरामायणाचे कवी ग. द. माडगूळकर यांचे स्मारक कोथरुड मध्ये उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गीतरामायणाचे संगीतकार असलेल्या सुधीरजी फडके यांच्या कार्यास साजेसे स्मारक कोथरुडमध्ये झाल्यास ते अधिक संयुक्तिक होईल. या दोन महान शिल्पकारांची स्मृती जतन करण्याची संधी यानिमित्ताने पुणे महानगरपालिकेला मिळणार आहे. चांदणी चौक परिसर रस्ते विकासामुळे आणि बंगलोर-मुंबईकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोथरुडजवळूनच जात असल्यामुळे हे स्मारक कोथरुड परिसरातच होणे आवश्यक वाटते.

यामुळे शहरातील वाहतुक या अडचणीशिवाय संपूर्ण राज्यातील आणि देशभरातील रिसकांना तसेच मान्यवर मंडळींना या दोन्ही स्मारकांमध्ये जाणे सोयीचे होईल. महाराष्ट्रातील आणि विदेशातील सुद्धा लक्षावधी रिसकांकडून पुणे महानगरपालिकेच्या या सांस्कृतिक कामाची नोंद घेतली जाईल. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुधीरजी फडके यांचे उचित स्मारक कोथरुडमध्ये उभे करण्याबाबत आवश्यक तो प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशी सूचना ना. पाटील यांनी मनपा आयुक्तांना केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×