Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

मुंबईच्या घरापायी चूलत भावाने काढला भावाचा काटा

दारू पाजून गळा कापून केला खून; बीडच्या हनुमंत पिंपरीतील घटना

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्हा पुन्हा एकदा खून प्रकरणाने हादरला असून, केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी शिवारात चुलत भावाने चुलत भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हनुमंत पिंपरी येथील विक्की उर्फ आण्णा रावसाहेब चंदनशिव वय (२५ वर्ष) या युवकाचा त्याचा सख्खा चुलत भाऊ महेश उत्तरेश्वर चंदनशिव याने धारदार हत्याराने गळा चिरून त्याचा खून केला आहे. एका तासात आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. डीवायएसपी व्यंकटराम यांच्या नेतृत्वात केज पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिस हवालदाराने २५ हजारांची लाच मागितली, गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

महेश त्रिंबक चंदनशिव याने दि. ३० जानेवारीला त्याचा सख्खा चुलत भाऊ विक्की उर्फ आण्णा रावसाहेब चंदनशिव याला सोबत घेऊन हनुमंत पिंपरी येथील पारधी वस्तीवर दारू पाजली. त्यानंतर त्याला जेवण्याच्या निमित्ताने मोटार सायकल वरून केवड येथील धाब्यावर नेले. त्यानंतर त्याला मोटार सायकलवर बसवून घेऊन केवड आणि हनुमंत पिंपरी येथील शिवरस्त्यावर घेऊन आला. तिथे कोणी नसल्याने त्या निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथे महेशने दारूच्या नशेत असलेल्या विक्की उर्फ आण्णा याला गाडीवरून उतरवून मारहाण केली. बतई सारख्या धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला. गळ्यावर वर्मी जखम झाली असल्याने अतिरक्तस्राव झाल्याने विक्की उर्फ आण्णा चंदनशिव याचा जागीच मृत्यू झाला. तो दारूच्या नशेत असल्याने त्याला प्रतिकार करता आला नसावा, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर विक्की उर्फ आण्णा चंदशिव याचे प्रेत रस्त्यावर टाकून महेश घरी निघून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याने विकीचे प्रेत पहिल्या नंतर त्याने पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गुप्ता पद्धतीने मारेकऱ्यांची माहिती काढली आणि अवघ्या एक तासात विक्की उर्फ आण्णा चंदनशिव यांचा मारेकरी त्याचा सख्खा चुलत भाऊ महेश उत्तरेश्वर चंदनशिव याला ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांनी प्रेत उत्तरीय तपासणी व शव विच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्यकेंद्र चिंचोली माळी येथे पाठविले होते. तसेच मयताची आई छाया रावसाहेब चंदनशिव यांच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट विक्की उर्फ अण्णा चंदनशिव याचा खून झालेल्या घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक व्यंकटेशराम, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, पोलिस उपनिरीक्षक अशोक सोनवणे यांनी भेट दिली. तसेच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर, बाळासाहेब अहंकारे, शिवाजी कागदे, आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे पथकाने भेट दिली.

विक्की हा चेंबूर, मुंबई येथून हनुमंत येथून हनुमंत पिंपरी येथे त्याच्या आईकडे आला होता. दि. ३० जानेवारीला त्याने त्याच्या आईला स्वयंपाक करून ठेव मी जेवायला येतो असे सांगून बाहेर गेला होता. म्हणून त्याची रात्रभर तो घरी कधी येईल म्हणून त्याची आई वाट पहात बसली. परंतु तो जेवायला घरी आलाच नाही.

आईने पोलिसांना दिली माहिती

विक्की उर्फ अण्णा चंदशिव याची आई छाया रावसाहेब चंदनशिव हिने दि. ३१ जानेवारी रोजी विक्की उर्फ आण्णा चंदनशिव याची गावात चौकशी केली असता त्याला महेश चंदनशिव याने त्याच्या मोटार सायकलवर बसवून घेऊन गेल्याची माहिती मिळाली. तिने ही माहिती पोलिसांना दिली आणि तीच खरा तपासाचा विक्की आणि त्यांचे चुलते व चुलतभाऊ यांचे चेंबूर, मुंबई येथील घरावरून त्यांच्या कुटुंबात वाद सुरू आहे. विक्की उर्फ आण्णा आणि त्याचे चुलते बाळासाहेब प्रल्हाद चंदशिव, उत्तरेश्वर प्रल्हाद चंदनशिव, बबन प्रल्हाद चंदशिव आणि नागुराव प्रल्हाद चंदनशिव यांच्यात वाद सुरू आहे. त्याच वादातून महेश उत्तरेश्वर चंदननशिव याने विक्की उर्फ आण्णा चंदनशिव या सख्या चुलत भावाचा खून केला.

असा लागला खुनाचा तपास

महेश चंदनशिव याने विक्की उर्फ आण्णा चंदनशिव या त्याच्या सख्ख्या चुलत भावाचा खून केल्या नंतर त्याला वाटले आपला कुणाला संशय येणार नाही. त्याच्या मोटार सायकलवर रक्ताचे डाग असावेत म्हणून त्याने मोटार सायकल स्वच्छ धुतली होती. परंतु सकाळी खुनाची घटना उघडकीस आल्या नंतर पोलिसांनी त्याला मोटार सायकलीसह त्याला बोलावून चौकशी केली. त्यावेळी त्याच्या मोटार सायकल पुसण्याचा कपडा ओला असल्याचे आढळू आले. तिथेच पोलिसांचा संशय खरा ठरला.

विक्कीचा चुलता फरार

मयत विक्की याचा एक चुलता ३० जानेवारी रोजी हनुमंत पिंपरी येथे गावात होता. परंतु त्याला विकीच्या उर्फ आण्णा चंदनशिव याच्या खुनाची माहिती मिळाल्यानंतर तो सुद्धा निघून गेला आहे. बाळासाहेब चंदनशिव याची पत्नी मुंबई येथे शिक्षिका आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×