Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पोलिस हवालदाराने २५ हजारांची लाच मागितली, गुन्हा दाखल

आरोपीला जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी मागितली लाच

marathinews24.com

पुणे – दाखल गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस हवालदाराने २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला. पोलिस हवालदार रमेश लक्ष्मण नागटिळक (४२) असे लाचखोर हवालदाराचे नाव असून, त्याने २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे एसीबीने केलेल्या तपासात निष्पन्न झाले. ही कारवाई शनिवारी (दि. ३१) करण्यात आली.

तेल खरेदीत नफा मिळवून देण्याचे आमिष; अडीच कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी

तक्रारदार महिलेच्या मुलाविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या प्रकरणात जामिनासाठी मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्याचे चार्जशीट लवकर न्यायालयात दाखल करण्यासाठी पोलिस हवालदार नागटिळक याने सुरुवातीला ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद केले होते. तडजोडीनंतर ही रक्कम २५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली. यानंतर तक्रारदाराने १८ जानेवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. त्यानंतर शनिवारी पोलिस हवालदार रमेश नागटिळक याने पैसे मागितल्याचे निष्पन्न होताच एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×