Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

तेल खरेदीत नफा मिळवून देण्याचे आमिष; अडीच कोटींची फसवणूक

Medicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूक

दुबईत वास्तव्य करणाऱ्या आरोपींसह ९ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – कच्चे तेल खरेदीत नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेची २ कोटी ५४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी दुबईत वास्तव्य करणाऱ्या तिघांसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रंगकाम करताना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू – सविस्तर बातमी

पूनम विशाल शेळके, विनायक महादेव शेळके, सुरेखा महादेव शेळके (तिघे रा. दुबई), वैशाली हनुमंत फडतरे (वय ४९, रा. विनायक अपार्टमेंट, आंबेगाव बुद्रुक), हनुमंत लक्ष्मण फडतरे, रितिका हनुमंत फडतरे, ऐश्वर्या ओंकार लोंढे, तसेच अल्फा माईंड सोल्यूशन्स, इन्फोसेस सोल्यूशन्स या कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३६ वर्षीय महिला मूळच्या सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील आहेत. दाेन वर्षांपूर्वी आरोपींशी त्यांची ओळख झाली होती बाणेर भागातील कार्यालयात आरोपींनी महिलेला बोलावून घेतले. कच्चे तेल खरेदी विक्रीत पैसे गुंतविल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले. महिलेला जाळ्यात ओढून आरोपींनी तिच्याकडून वेळोवेळी २ कोटी ५४ लाख ८४ हजार रुपये घेतले. गुंतवणूक केल्यानंतर महिलेला आरोपींनी परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अलका सरग तपास तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×