चंदननगर पोलिसांनी केली अटक
marathinews24.com
पुणे – दुचाकीस्वार मुलीला अडवून एकाने तिच्यावर वार करून गंभीररित्या जखमी केले. भांडणात मध्यस्थी करणार्या मुलालाही आरोपीने मारहाण करीत शिवीगाळ केली. याप्रकरणी संबंधिताला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ४ नोव्हेंबरला रात्री सव्वा नउच्या सुमारास वडगाव शेरीतील भाजी मंडईत घडली. शाहिद करीम शेख (वय २०, डॉ. आंबेडकर वसाहत) याला अटक केली आहे. पीडितेच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दुकानांचा दरवाजा उचकटून चोरीचे प्रकार वाढले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची मुलगी ४ नोव्हेंबरला रात्री नउच्या सुमारास वडगाव शेरीतील भाजी मंडई परिसरातून दुचाकीवरून जात होती. त्यावेळी आरोपी शाहिद शेख याने तिला अडविले. काहीही कारण नसताना तिला शिवीगाळ करून तिच्यावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीररित्या जखमी केले. दरम्यान, भांडणात मध्यस्थी करणार्या मुलालाही आरोपीने मारहाण केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक किरण नरवडे तपास करीत आहेत.





















