दत्तवाडी, वाघोलीतील घटना
marathinews24.com
पुणे – शहरात दुकानांचा दरवाजा उचकटून रोकड, तसेच मुद्देमाल चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. चोरट्यांनी दत्तवाडी भागातील एका किराणा माल विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून विविध वस्तू चोरून नेल्याची घटना घडली, तसेच वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरात औषध विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी २ लाख २३ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.ओैषध विक्रत्याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कोंढव्यात भरदिवसा घरफोडी; दीड लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ओैषध विक्रेत्याचे नगर रस्त्यावरील आव्हाळवाडी परिसरात दुकान आहे. चोरट्यांनी मंगळवारी (४ नोव्हेंबर) मध्यरात्री ओैषध विक्री दुकानाचा दरवाजा उचकटला. चोरट्यांनी गल्ल्यातील दोन लाख २३ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक देवगडे तपास करत आहेत.
दत्तवाडी परिसरातील एका किराणा माल विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ३० हजार रुपयांच्या विविध वस्तू चोरून नेल्या. याबाबत किराणा माल विक्रेत्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे दत्तवाडीतील म्हसोबा चौकात किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून विविध प्रकारच्या वस्तू चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस हवालदार सचिन अहिवळे तपास करत आहेत.




















