चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – भरदिवसा सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा १ लाख ४२ हजार रुपयांचा चोरून नेल्याची घटना कोंढवा भागात नुकतीच घडली.
कोंढव्यात पकडलेल्या संशयित दहशतवाद्याच्या मोबाइलमध्ये पाकिस्तानी क्रमांक – सविस्तर बातमी
याबाबत एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शिवनेरीनगर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. १ नोव्हेबर रोजी तक्रारदार आणि कुटुंबीय कामानिमित्त सकाळी बाहेर पडले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करत आहेत.




















