Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

दामिनी मार्शलच्या हिसक्याने कष्टकरी महिलेला मिळाले पैसे

She left the village out of anger at her parents; but her life was saved by the Pune police

कोंढवा पोलिसांच्या ‘दामिनी मार्शल पथकाची उत्तम कामगिरी 

marathinews24.com

पुणे – महिन्याला फक्त ७ हजार रुपये पगारात घर चालवणार्‍या एका कष्टकरी महिलेला घराच्या दुरुस्तीसाठी साठवलेले ५ हजार रुपये कोंढवा पोलिसांच्या ‘दामिनी मार्शलने’ परत मिळवून दिले आहेत. महिला पोलीस अंमलदार दामिनी मार्शल ए. डी. चेचर यांनी वाद मिटवून महिलेला मदत केली. एनआयबीएम रोड परिसरात राहणार्‍या मनीषा (वय ४०) यांनी घराच्या दुरुस्तीसाठी ३ एप्रिल २०२५ रोजी गिरिधर नावाच्या (वय ४२) एकाला ५ हजार रुपये दिले होते. मात्र अनेक आठवडे उलटूनही त्याने कोणतेही काम सुरू केले नाही. उलट मनीषा यांचे कॉलही त्याने ब्लॉकमध्ये टाकले होते.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने एका व्यक्तीवर स्थानबद्धेची कारवाई – सविस्तर बातमी  

निराश झालेल्या मनीषा यांनी २७ जून रोजी ‘दामिनी मार्शल’ पथकाला कॉल करून मदत मागितली. पोलीस अंमलदार ए. डी. चेचर यांनी तत्काळ प्रतिसाद देत गिरिधर याच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला टाळाटाळ केल्यानंतर पोलिसांनी खडसावून विचारणा केल्यावर त्याने पैसे घेतल्याची कबुली दिली. त्याला दोन दिवसांची मुदत देऊन ५ हजार रुपये परत करण्यास सांगण्यात आले. शेवटी गिरिधरने मनीषा यांना संपूर्ण रक्कम परत केली. या रकमेवर माझ्या घराचे स्वप्न होते. ती रक्कम मला परत मिळाली याचा मला खूप आनंद आहे, असे भावनिक उद्गार मनीषा यांनी काढले आहेत. त्यांनी दामिनी मार्शल पथकाचे आभार मानले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी मदत चेचर यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×