Breking News
मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही; सुप्रिया सुळेऑस्ट्रेलियासह पुण्यातही मानसिक व शारीरिक त्रासाचा सामना…क्रांतिवीर चाफेकर बंधूचे स्मारक युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादनपुरस्कार विजेत्यांनी खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम करावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसक्रीडासह विविध क्षेत्रात महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनपिंपरी-चिंचवड; दारूच्या नशेत बरळला अन खुनाची उकल झाली !सावकरासोबत पत्नीचे झेंगाट जुळले…मांजरी बुद्रूक परिसरात घरफोडी, ५ लाखांचा ऐवज लंपासशेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिष, दोघांची ६२ लाखांची फसवणूकपुणे : वर्दळीच्या मार्केटयार्ड परिसरात वाहतूक बदल

पोलीस उपनिरीक्षकाला ताब्यात घेण्यासाठी १३ जणांचे पथक…

पुण्यातून वादग्रस्त अधिकारी रणजित कासले बीड पोलिसांच्या ताब्यात

Marathinews24.com

पुणे – बीडमधील वादग्रस्त निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे, सरपंच संतोष देशमुख हत्या, खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर नवनवीन आरोप करीत आहेत. यादरम्यान कासले यांच्यावर प्रकरणात बीड येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कासले हे पसार झाल्यानंतर १७ एप्रिलला रात्री पुणे विमानतळावर दाखल झाले होते. अखेर १८ एप्रिलला बीड पोलिसांच्या १३ जणांच्या पथकाने स्वारगेट परिसरातील हॉटलेमध्ये धाव घेत कासले यांचा ताबा घेतला आहे.

वाल्मीक कराडचे एन्काऊंटर करण्यासाठी मला ऑफर – सविस्तर बातमी

दिल्ली येथून पुणे विमानतळावर रणजीत कासले यांचे गुरुवारी आगमन झाल्यानंतर प्रसारासाठी माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी आरोप केले. त्यानंतर स्वारगेट येथील एका हॉटेलमध्ये राहण्यास गेले होते. मात्र पहाटेच्या सुमारास रणजीत कासले यांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top