ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू

अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी

marathinews24.com

पुणे – दुचाकीवरुन ट्रिपल सीट निघालेल्या तिघांना भरधाव ट्रकने धडक दिल्याची घटना वानवडी भागात घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाला असून, दुचाकीस्वारासह दोघे जण जखमी झाले. रितेशकुमार महिंदरसिंग (वय २७, रा. लोहदरदुर्ग, झारखंड) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार शूभम ज्ञानेश्वर इंगळे (वय २७, रा. थिटे वस्ती, खराडी), सहप्रवासी रवी चौरसिया जखमी झाले आहेत. पोलीस हवालदार सचिन घोडके यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदाराकडून दीड हजारांची लाच घेणाऱ्याला लिपिकाला पकडले – सविस्तर बातमी 

धोकादायक पद्धतीने दुचाकी चालविल्याप्रकरणी दुचाकीस्वार शुभम इंगळे, तसेच ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार शुभम इंगळे, रितेशकुमार, रवी चौरसिया हे ट्रिपल सीट निघाले होते. २ जून रोजी दुपारी पुणे-सोलापूर रस्त्यावरील वानवडीतील क्रोमा शोरुम चौकात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली.

अपघातात रितेशकुमार, चौरसिया यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान रितेशकुमार याचा रुग्णालयात नुकताच मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. दुचाकीस्वार इंगळेने धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी त्याच्यासह ट्रक चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक लोंढे तपास करत आहेत.

मतिमंद मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

Crime News : मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या एकाला खडक पोलिसांनी अटक केली. शाम ज्ञानोबा हातागळे (वय ५०, रा. घोरपडे पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आजीने खडक पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिलेची १६ वर्षीय नात मतिमंद आहे. ती सोमवारी (३० जून) दुपारी घरासमाेर खेळत होती. त्या वेळी आरोपी हातागळे तेथे आले. त्याने मुलीला आमिष दाखवून वसाहतीतील सार्वजनिक स्वच्छतागृहात नेले. तेथे मुलीला धमकावून त्याने तिच्याशी अश्लील कृत्य केले. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने आजीला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर आजीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. हातागळे याच्याविरुद्ध मंगळवारी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

रिक्षा प्रवासी मुलीसोबत अश्लील कृत्य

Crime News : रिक्षा प्रवासी अल्पवयीन मुलीशी एकाने अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला ही मंगळवारी (१ जून) दुपारी मुलीसोबत रिक्षातून पुणे-सोलापूर रस्त्याने निघाली होती. त्यावेळी रिक्षात प्रवासी म्हणून बसलेल्या एकाने महिलेच्या मुुलीसोबत अश्लील कृत्य केले. मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. तिने रिक्षातील प्रवाशाला जाब विचारला. तेव्हा रिक्षातील प्रवाशाने महिलेला शिवीगाळ केली. तिला धमकी देऊन ताे पसार झाला. याबाबत महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, रिक्षा प्रवाशाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बोबडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top