Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

कोल्हापूरच्या मिश्र खत कारखान्यात दुसरे उत्पादन सत्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ऑनलाइन शुभारंभ

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ऑनलाइन शुभारंभ; दररोज ४० मेट्रिक टन अतिरिक्त खत उत्पादन होणार

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या कोल्हापूर येथील मिश्र खत कारखान्यातील दुसऱ्या उत्पादन सत्राचा शुभारंभ कृषिमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला.

पिंपळवंडीतील बालिका अत्याचार व हत्या प्रकरणी पीडित कुटुंबाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट – सविस्तर बातमी

या कार्यक्रमास कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, विभागीय व्यवस्थापक, कारखाना व्यवस्थापक तसेच मुख्य कार्यालयातील संबंधित अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

मिश्र खताचे उत्पादन वाढल्याने आगामी खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खताचा पुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, कृषी उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्याला चालना मिळेल असा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला.

महामंडळाच्या कोल्हापूर येथील मिश्र खत कारखान्यात उत्पादित होणाऱ्या मिश्र खताचा पुरवठा कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच धाराशिव व पुणे जिल्ह्यांमध्ये केला जातो. कृषी उद्योग मिश्र खतांना शेतकऱ्यांची पसंती असून, बाजारातील इतर खतांच्या तुलनेत या मिश्र खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे महामंडळाने नमूद केले आहे.

सध्या कारखान्यात एका सत्रामध्ये मिश्र खताचे उत्पादन सुरू असून दररोज सुमारे ४० मेट्रिक टन उत्पादन होते. कारखान्याची मंजूर वार्षिक उत्पादन क्षमता १६ हजार मेट्रिक टन आहे. खरीप व येणाऱ्या रब्बी हंगामातील वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खताचा सुरळीत पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादन क्षमतेचा अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने दुसरे उत्पादन सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दररोज सुमारे ४० मेट्रिक टन अतिरिक्त उत्पादन होऊन कारखान्याच्या वार्षिक उत्पादन क्षमतेनुसार उत्पादन घेणे शक्य होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×