Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

हवाई दलातील शिपायाची दादागिरी

हवाई दलातील शिपायाची दादागिरी

वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की, ब्रेथ अ‍ॅनालायझरची केली तोडफोड

marathinews24.com

पुणे – शहरात ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी मोहिमेला विरोध करीत हवाई दलातील शिपायाने वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यानंतर ब्रेथ अ‍ॅनालायझरची तोडफोड केल्याची घटना ३ जानेवारी रात्रीच्या सुमारास विमाननगर भागात घडली. शासकीय कामात अडथळा आणणे, धक्काबुकी केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी हवाई दलातील शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार आनंद गोसावी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पत्नी फेसबुक लाईव्ह करत असताना पतीचा जीव गेला – सविस्तर बातमी 

मद्यपी वाहन चालकांकडून होणारे गंभीर अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी ३ जानेवारीला रात्री साडे अकराच्या सुमारास विमाननगर परिसरात नाकाबंदी करीत तपासणीला गती दिली होती. त्यावेळी हवाई दलातील शिपाई पदावर कार्यरत असलेला दुचाकीवरुन जात होता. तो हवाई दलाच्या वसाहतीत राहायला आहे. वाहतूक शाखेतील हवालदार गोसावी यांनी नाकाबंदीत वाहन अडवून तपासणी सुरू केली. तेव्हा शिपायाने गोसावी यांना धक्काबुक्की केली.

ब्रीथ अ‍ॅनालायजर यंत्र हिसकावून घेत तोडफोड केली. त्यावेळी नाकाबंदीतील पोलिसांनी शिपायाला ताब्यात घेतले. माहिती मिळताच विमाननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत. याप्रकरणी हवाई दलातील शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करुन नोटीस बजावली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×