Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

अँड. प्रकाश आंबेडकर यांचा भव्य नागरी सत्कार होणार

अँड. प्रकाश आंबेडकर यांचा भव्य नागरी सत्कार होणार

पुण्यातील गणेश कला रंगमंच येथे जाहीर भव्य नागरी सत्कार

marathinews24.com

पुणे– आंदोलनात पोलीस हल्ल्याच्या प्रकरणी शहीद झालेला सच्चा आंबेडकरी कार्यकर्ता शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावरून व नंतर थेट कोर्टात स्वतः लढाई लढणारे वंचित आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा पुण्यातील गणेश कला रंगमंच येथे जाहीर भव्य नागरी सत्कार राजभरातील हजारो वडार समाज व बहुजन समाजाच्यावतीने होणार असल्याचे वडार समाज संघाचे अध्यक्ष व वंचितचे नेते अनिल जाधव यांनी सांगितले आहे.

सकारात्मकता आणि प्रगतीचे दिशादिग्दर्शन व्हावे; ४३ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचा समारोप – सविस्तर बातमी 

रस्त्यावरून ते थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत वडार समाजाचे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय- हक्कासाठी सातत्याने लढा देऊन न्याय मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्रातील समस्त वडार समाजाच्या वतीने आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा जाहीर नागरी सत्कार समारंभ आयोजित करून वडार समाज भावना व्यक्त करणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक वडार समाजाचे नेते अनिल जाधव असणार आहेत. हा समारंभ सोमवार दिनांक २५ ऑगस्टला पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात येत आहे. ऐतिहासिक समारंभास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात येत आहे .

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×