कसबापेठ विधानसभा मतदार संघ
marathinews24.com
पुणे – पदवीधर व शिक्षक मतदारसंघ अंतर्गत कसबापेठ विधानसभा मतदार संघातील पात्र पदवीधर मतदार व शिक्षक मतदारांनी 6 नोव्हेंबरपूर्वी मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन पुणे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.
संरक्षित सिंचनामुळेच फलोत्पादनात राज्य अग्रेसर : डॉ. कैलास मोते – सविस्तर बातमी
कसबापेठ मतदार संघाकरीता एकूण 13 मतदान केंद्रे आहेत. शिक्षक मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता शिक्षक मतदारांसाठी नमुना क्र. 19 व पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता नमुना क्र. 18 उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मतदान केंद्रांसाठी पदनिर्देशित अधिकाऱ्यांची पुढील प्रमाणे नेमणूक करण्यात आली आहे.
भवानी पेठ (केंद्र क्र. 58) भवानी पेठ, टिम्बर मार्केट, रामोशी गेट पोलिस स्टेशन, भवानी पेठ पोस्ट ऑफिस, किदवई उर्दू हायस्कूल, एचपी पेट्रोल पंप, अरुण वैद्य स्टेडियम, बापूसाहेब पवार कन्या शाळा, सन्मित्र सहकारी बँक लि. पूना कॉलेज व विज्ञान क्षेत्रीय कार्यालय आदी परिसरातील मतदान केंद्रांची जबाबदारी सहायक आयुक्त, कसबा पेठ प्रभाग कार्यालय, पुणे महानगरपालिका प्रकाश बालगुडे यांच्याकडे असून त्यांचा दूरध्वनी क्रमांक 9356899396 आहे.
बुधवार पेठ (केंद्र क्र. 62) बुधवार पेठ, दगडुशेठ मंदिर, आप्पा बळवंत चौक, विश्रामबाग वाडा, पोस्ट ऑफिस, तुळशीबाग, महात्मा फुले मंडई, रामेश्वर चौक, शनिपार चौक व हुतात्मा बाबूजेनु चौक या परिसरातील मतदान केंद्रांसाठी उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक ९४२२६२४६४८ आहे.
गणेश पेठ (केंद्र क्र. 66) संत कबीर पोलिस स्टेशन, ओसवाल पंचायत भवन, कपिल एजन्सीज, महात्मा जोतिराव फुले कन्या शाळा, प्रजापती ब्रम्हकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय, पांगुळ आळी, आवरलेडी इमॅकुलेट चर्च, पेन्शनवाला मशिद, गणेश पेठ परिसरातील मतदान केंद्रांसाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ११), सुरेखा माने, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (संपर्क: ७७७५९०५३१५)
गंज पेठ (केंद्र क्र. 68) महात्मा फुले वाडा, सेंट्रल फायर ब्रिगेड, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक (नाट्यगृह), इस्बेला इमोनिया चर्च, ए डी कॅम्प चौक, संपूर्ण गंज पेठ या भागातील केंद्रांसाठी मनपाच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी, कैलास केंद्रे यांच्याकडे जबाबदारी असून संपर्क क्रमांक ९५७९३१८८७८ आहे.
गुरुवार पेठ (केंद्र क्र. 73) बलवार आळी, सेंट थॉमस हायस्कूल, प्रतिभा मॅन्शन, शितला देवी मंदिर, संपूर्ण गुरुवार पेठ या भागाची जबाबदारी उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी अनिल पवार (संपर्क: ९४२२९४३५४९) यांच्याकडे आहे.
कसबा पेठ (केंद्र क्र. 74) दारूवाला पूल, कसबा गणपती, लाल महाल, पवळे चौक, साततोटी चौक, दगडी नागोबा, गणेश रोड, फडके हौद चौक, कसबाचा संपूर्ण भाग आदी परिसरातील मतदान केंद्रांचे कामकाज उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १५) श्वेता दारूणकर, टिळकरोड क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे असून संपर्क क्रमांक ७७०९८५४२३४ आहे.
नानापेठ (केंद्र क्र. 78)- नानापेठचा संपूर्ण भाग, अशोक चौक, निवडुंग विठ्ठल मंदिर, ए डी कॅम्प चौक, चांद तारा मस्जिद परिसरासाठी तहसिलदार व सहायक जिल्हा पुनर्वसन अधिकारी (कुकडी प्रकल्प, पुणे), जिल्हाधिकारी कार्यालय मनिषा नेलभाते यांच्याकडे जबाबदारी असून संपर्क क्रमांक 9921910917 आहे.
नारायण पेठ (केंद्र क्र. 79)- नारायण पेठचा पूर्ण भाग, डॉ. केतकर रोड, रमणबाग चौक, प्रभुणे रोड या भागासाठी तहसिलदार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, विधानभवन रमा जोशी यांच्याकडे जबाबदारी असून संपर्क क्रमांक ९६२३२२९५९९ आहे.
नवी पेठ (केंद्र क्र. 80)- नवी पेठचा संपूर्ण भाग, साने गुरुजी वसाहत, राजेंद्र नगर, वैकुंठ स्मशानभूमी, विठ्ठल मंदिर नवी पेठ, अलका चौक परिसरातील मतदान केंद्रांसाठी तहसिलदार, झो. पु. प्रा., चतुश्रृंगी रोड, पुणे सुषमा पैकीकरी यांच्याकडे जबाबदारी असून संपर्क क्रमांक: ८६९८६८१७१९ आहे.
रविवार पेठ (केंद्र क्र. 84) संपूर्ण रविवार पेठ परिसर, शितलादेवी चौक, सतरंजीवाला चौक, मीरा दातार दर्गा, बोहरी आळी, अग्रेसेन भवन, कस्तुरे चौक, भांडे आळी, सोन्या मारुती चौक, मोती चौक, फडके होद चौक परिसरातील मतदान केंद्रांसाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. 6, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे वनश्री लाभशेटवार यांचकडे जबाबदारी असून संपर्क क्रमांक 9588626237 असा आहे.
सदाशिव पेठ (केंद्र क्र. 85)- सदाशिव पेठ, अभिनव चौक, सिलाई चौक, हीराबाग चौक, एस. पी. कॉलेज, ग्राहक पेठ, शनिपार चौक, कुमठेकर रोड, पेरूगेट, राजाराम मित्र मंडळ चौक, हीराबाग गणपती चौक परिसरातील मतदान केंद्रासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महेश सुधाळकर यांच्याकडे जबाबदारी असून संपर्क क्रमांक 8806698000 असा आहे.
शनिवार पेठ (केंद्र क्र. 87) शनिवार पेठेचा संपूर्ण भाग, अहिल्याबाई होळकर चौक, दिवाकर रोड, मोतीबाग कार्यालय, शनिवार वाडा परिसरातील मतदान केंद्रासाठी उपजिल्हाधिकारी विशेष घटक क्र. 1, नवीन प्रशासकीय इमारत, विधानभवनसमोर, पुणे मंगेश देशपांडे यांच्याकडे जबाबदारी असून संपर्क क्रमांक 8796187846 असा आहे.
शुक्रवार पेठ (89) शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरी, वाडिया हॉस्पिटल, सुभाषनगर, राष्ट्रभूषण चौक, शिवाजी मराठा हायस्कूल, रामेश्वर चौक, खडकमाळ आळी, एबीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, महाराणा प्रताप गार्डन, नातू बाग परिसरातील मतदान केंद्रासाठी तहसिलदार पुणे शहर, खडकमाळ आळी, पुणे सूर्यकांत येवले यांच्याकडे जबाबदारी असून संपर्क क्रमांक 9422948008 असा आहे.
पदवीधर मतदार नोंदणीसाठी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान ३ वर्षापूर्वी पदवीधर झालेला किंवा पदवीशी समकक्ष शैक्षणिक पात्रता धारण करणारा पदवीधर पात्र राहील. १ नोव्हेंबर २०२५ च्या लगत पूर्वीच्या सहा वर्षांतील किमान तीन वर्ष माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या अशा राज्यातील कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत अध्यापन केलेला प्रत्येक शिक्षक मतदार यादीत नाव नोंदविण्यास पात्र आहे.



















