Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

संरक्षित सिंचनामुळेच फलोत्पादनात राज्य अग्रेसर : डॉ. कैलास मोते

गुणवत्तापूर्ण शेततळ्यांमुळे जलसंधारणाला नवे बळ

marathinews24.com

पुणे – देशात शेतमालासह फलोत्पादन आणि निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा अग्रगण्यवाटा असून, प्रतिकूल परिस्थितीत बारमाही फळबागा टिकविणे हेआव्हानात्मक असते. अशा वेळी शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाच्या सुविधा प्लास्टिक आच्छादनातील शेततळ्यांद्वारे उपलब्ध झाल्याने जलसंधारण आणि फलोत्पादनाला नवे बळ मिळाले आहे. या क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल असून, सामुदायिक व वैयक्तिक शेततळ्यांच्या योजनांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळेच महाराष्ट्राचा देशपातळीवर विशेष उल्लेख होतो, असे मत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे (एनएचएम) माजी संचालक डॉ. कैलास मोते यांनी व्यक्त केले.

पुण्यात पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री करणार – सविस्तर बातमी 

शेततळ्यांची गुणवत्तापूर्ण जोडणी करून त्यांचा टिकाऊपणा वाढविण्याच्या उद्देशाने मिपा इंडस्ट्रीज (मिपाटेक्स) आणि वेल्डी – लिस्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच‘जिओवेल्ड कनेक्ट २०२५’ या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पुणे येथे करण्यात आले. यावेळी डॉ. मोते बोलत होते.

मिपाटेक्स, हा मिपा इंडस्ट्रीजचा अग्रगण्य ब्रँड असून पॉलिमर आधारित शेती आणि जल संधारणासाठी आधुनिक उपाय प्रदान करतो. तर वेल्डी– लिस्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लि. प्लास्टिक वेल्डिंग तंत्रज्ञानातील अचूकता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. दोन्ही संस्थांचे ध्येय गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ शेततळी उपलब्ध करून देणे, जे शेतकऱ्यांना जलसंधारणासाठी अधिक कार्यक्षम आणि दीर्घकालीन उपाय देतात.

कार्यक्रमाला भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) पुणेचे उपसंचालक अक्षय कुटे, मिपा इंडस्ट्रीजचे संचालक प्रकाश रिजाल, प्रदीप वाघ, मॅनेजर आनंद ताटे, आनंद दास, विशाल मुखी, राजकुमार सिंग, राजकुमार पवार, विशाल चव्हाण, तसेच वेल्डी कंपनीचे जिनिश जोसेफ आणि यशोदीप जाधव उपस्थित होते.

बीआयएसचे अक्षय कुटे यांनी शेततळी उत्पादक व वितरकांनी आयएसआय मार्क असलेली उत्पादने पुरवावीत आणि मानकांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले. वेल्डीचे जिनिश जोसेफ यांनी राजस्थानही मोठी बाजारपेठ असल्याचे सांगून प्लास्टिक वेल्डिंग तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. महाराष्ट्र प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे सचिव नितीन पटवा व खजिनदार करण मेहता यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाश रिजाल आणि प्रदीप वाघ यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×