मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या हस्ते गौरव
marathinews24.com
पुणे – (अनंत जाधव) : मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांना मराठवाडा पुण्य भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. पुण्यभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ४ ॲाक्टोबरला काळे हॉल, गोखले इन्स्टिट्यूट येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. गो. बं देगलूरकर होते. तर या कार्यक्रमाचे आयोजन ॲड दादासाहेब भोईटे, विठ्ठल कदम, ॲड अविनाश कामखेडकर यांनी केले. पुरस्कार सोहळ्याचे वितरण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या हस्ते यांच्यासह अन्य पुरस्कारर्थी प्रमोद गिरिगोस्वामी ऋषिकेश सारूक ॲड. धैर्यशील गाढवे, ॲड. मोनाली काळे शिंदे, ॲड. गणेश कवडे विश्वजित पाटील, ॲड. पवन कुलकर्णी,ॲड. भाग्यश्री गुजर-मुळे यांना विविध मान्यवरांच्या हस्ते २०२५ चा मराठवाडा पुण्य भूषण पुरस्काराचे सन्मान चिन्ह आणि गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
रब्बी हंगामपूर्व पीक नियोजन अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन – सविस्तर बातमी
पुरस्कारर्थी भाऊसाहेब जाधव म्हणाले, माझ्या पुरस्कार मध्ये माझा एकट्याचा वाटा नसून माझ्या पत्नीचा बहुमूल्य वाटा आहे पुढे बोलताना आपल्या गावाकडचे काही किस्सेही त्यांनी सांगितले. जेव्हा मी पुण्यात आलो तेव्हा मला अनेक अडचणीना सामोरे जावा लागले. माझ्या शौषणिक जीवनातील विविध अनुभव त्यांनी प्रेक्षकांसमोर मांडले आणि हा मिळालेला पुरस्कार हा माझा नसुन हा तुम्हा सर्वांचा पुरस्कार आहे असे बोलून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच न्यायमूर्ती मा. शिवकुमार डीगे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सम्राट नेपोलियनच्या कारकीर्दी मध्ये अशक्य हा शब्द कधीच वापरला नाही त्याच प्रमाणे मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव सर यांनी ही मराठवाड्यातील गरीब व गरजूवंत, होतकरू विद्यार्थ्यांना मदत करताना व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवताना नाही शब्द हा कधीच वापरला नाही. यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच राहण्याच्या जेवणाच्या व इतर समस्याही सुटत गेल्यामुळे मराठवाड्यातील हजारो विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षण घेऊ शकले व ते सर्वजण वेगवेगळ्या पदावर आहेत. सरांनी आधार वडा प्रमाणे मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये मायेची सावली दिली. जे विद्यार्थी जाधव सरांच्या संपर्कात आले नसते तर ते विद्यार्थी आज आपल्याला तज्ञ दिसले नसते, सेलू सारख्या छोट्या गावातून सुरू केलेला प्रवास इथ पर्यंत सोपं नव्हता. ज्या ठिकाणी सरकार मदतीसाठी पोहोचू शकत नाही तिथे मराठवाडा मित्रमंडळ सारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था मदत करतात.
एखाद्या सुपरहीट चित्रपटात आमीताफ बच्चन सारखे हिरो हे चित्रपटसृष्टीतील पडद्यावरचे नायक असले तरी जाधव सर हे सामाजिक क्षेत्रातील मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी खरे नायक आहेत. जाधव सरांनी पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना, शिक्षणासाठी पैसे नसलेल्या गावी परतणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मदत करून आधार दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जाधव सरांना आणि अन्य सत्कार मुर्ती यांना न्यायमूर्ती डीगे यांनी शुभेच्छा दिल्या. ॲड अविनाश कामखेडकर आपले मत व्यक्त करताना आपल्या महाविद्यालयीन जीवनातील काही जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की मराठवाडा महाविद्यालयात शिक्षण घेत असताना घडल्याले काहीं जुने किस्से सांगून यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
डॉ. गो.बं देगलूरकर या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना म्हणाले सातवाहन काळापासून ते यादवांच्या काळापर्यंत जितके राज्यकर्ते झाले, त्या सर्वांच्या राजधान्या मराठवाड्यात होत्या. ‘यथा राजा, तथा प्रजा’ या उक्तीप्रमाणे त्यांनी निर्माण केलेली संस्कृती संपूर्ण महाराष्ट्राभर पसरली. एकेकाळी असा वैभव असणाऱ्या मराठवाड्यात आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. भाऊसाहेब जाधव आणि त्यांच्या कार्याकडे पाहिले की त्याची प्रचिती येते. गोदावरीचे पाणी प्यायलेला मनुष्य मागे राहणार नाही. मराठवाड्याने अनेक संतांचे कार्य पाहिले. ‘एक एका साह्य करूं, अवघें धरूं सुपंथ’ असे कार्य करणारी माणसे इथे उभी राहिली. मराठवाड्यातील माणसे भांडत नाहीत, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. विदर्भाने भांडून आपला हक्क मिळवला. मात्र, मराठवाड्याकडे नेहमीच दुर्लक्षच होत गेले. या देशाला मराठवाड्याने अनेक कर्तृत्ववान माणसे दिली. त्यात गुजरात राज्याच्या किनारपट्टीवरील लोथल आणि बेट द्वारका यांच्यासारख्या महत्वाच्या पुरातत्व स्थळांचा शोध लावणारे एस. आर. राव यांच्यासारख्या व्यक्तींचा समावेश होतो. अशी अनेक रत्ने मराठवाड्याने दिली आहेत. त्यामुळे मराठवाड्याला मागास समजण्याचे कोणतेही कारण नाही. आता आपण मागासलेले नाहीत असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित लातूरचे डीजीपी संतोष देशपांडे, पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्यासह मराठवाडा मित्र मंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राम माने यांनी केले. कार्यक्रमाची सांगता स्वागत गीताने करण्यात आली.



















