Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

रब्बी हंगामपूर्व पीक नियोजन अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

रब्बी हंगामपूर्व पीक नियोजन अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन, आधुनिक शेती पद्धती व उत्पादनवाढीबाबत दिली माहिती 

marathinews24.com

बारामती – कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी हंगामपूर्व पीक नियोजन अभियान अंतर्गत मौजे बाबुर्डी, पानसरेवाडी, दंडवाडी, बोरकरवाडी, आंबी खुर्द, तरडगाव व लोणीभापकर या गावांमध्ये शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

शिवसेनेचे राजकारण सत्तेसाठी नाही- उद्धव ठाकरे – सविस्तर बातमी 

यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन, आधुनिक शेती पद्धती व उत्पादनवाढीबाबत माहिती दिली. तालुका कृषि अधिकारी सचिन हाके यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व मोहिमांबाबत माहिती दिली. त्यामध्ये महाडीबीटी, मनरेगाअंतर्गत फळबाग लागवड, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, ठिबक सिंचन, अवजारे बँक, वैयक्तिक व सामूहिक शेततळे आदींचा समावेश आहे.

डॉ. विवेक भोईटे, डॉ. संतोष करंजे व डॉ. रतन जाधव यांनी रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी, लसूण, जवस, चारा मका व मुरघास या पिकांबाबत सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ, उप कृषि अधिकारी प्रशांत मोरे, बापु लोदाडे, सहायक कृषि अधिकारी दिलीप यादव, अमोल लोणकर, प्रवीण चांदगुडे, गणेश कदम, भिमराव लोणकर, स्वप्निल गायकवाड तृप्ती गुंड उपस्थित होते

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×