पुण्यातील कुख्यात गुंड आंदेकरच्या मुलीसह भावजय विजयी

सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकरने महापालिका निवडणुकीत मारली बाजी

marathinews24.com

पुणे – शहरातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याची मुलगी आणि भावजय महापालिका निवडणुकीत विजयी झाले आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या प्रभागातून सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर विजयी झाल्या.

पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६ सायकल स्पर्धा टप्पा क्रमांक एक ; वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी – सविस्तर बातमी

नाना पेठेतील टोळी युद्ध आणि वर्चस्वाच्या वादातून ४ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नाना पेठेत त्यांच्या घराजवळ पिस्तुलातून गोळ्या घालून खून करण्यात आला होता. घटनेनंतर नाना पेठेतील टोळी युद्ध भडकले. वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ६ सप्टेंबर २०२५ रोजी आंदेकर टोळीने आयुष गणेश कोमकर ( वय १९) याच्यावर पिस्तुलातून गोळ्या घालून खून केला होता.

आयुष कोमकर हा आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा राणोजी आंदेकर (वय ७०) यांचा नातू होता. वनराज आंदेकर खून प्रकरणात आयुषचे वडील गणेश कोमकर याचा हात होता. आयुषचा खून केल्यानंतर बंडू आंदेकर यांच्यासह १६ जणांना अटक केली होती. आयुष कोमकर खुनाचा कट रचल्याच्या आरोपावर सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना अटक झाली होती. सध्या त्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. आंदेकर कुटुंबियांना विशेष न्यायालयाने निवडणूक लढवण्याची परवानगी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदेकर यांना तिकीट दिल्यानंतर राजकीय खळबळ उडाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयावर टीकाही झाली होती. संपूर्ण शहराचे लक्ष लागलेल्या प्रभागातून आंदेकर यांचा विजय निश्चित झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला.

कल्याणी कोमकर याना २८२ मते

प्रभागातून आयुषची आई कल्याणी कोमकर हिने अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांना २८२ मते पडली होती.आंदेकर कुटुंबियांना तिकीट न देण्याची विनंती अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानंतरही आंदेकर यांची उमेदवारी कायम केली होती.

पोलिस आयुक्तांचे विशेष लक्ष

निवडणूकीत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित प्रभागात विशेष लक्ष ठेवले होते. प्रतिबंधक कारवाईचा वेग वाढवण्यात आला होता. निवडणुकीत कडज बंदोबस्त ठेवला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×