Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात दुचाकीस्वार चोरट्यांचा हैदोस

ज्येष्ठ महिलेचे दोन लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; कर्वेनगरमधील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, पादचारी महिलांना लक्ष्य करीत सोन्याचे दागिने हिसकावून नेले जात आहेत. विशषेतः रात्रीच्या वेळी शतपावलीसाठी घराबाहेर पडणार्‍या महिलांचा पाठलाग करीत त्यांच्या गळ्यातील दागिने चोरून नेले जात आहेत. त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली असून, दुचाकीस्वार चोरट्यांचा अटकाव करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पार्टटाईम नोकरीचे आमिष भोवले, तरूणाला १३ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

रस्त्याने पायी चाललेल्या जेष्ठ महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना ११ नोव्हेंबरला रात्री नउच्या सुमारास कर्वेनगरमधील मनमोहन सोसायटीजवळ घडली आहे. याप्रकरणी ६८ वर्षीय महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला कर्वेनगरमध्ये राहायला असून, ११ नोव्हेंबरला रात्री सव्वा नउच्या सुमारास मनमोहन सोसायटीच्या मुख्य रस्ता परिसरातून पायी जात होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेजवळ येउन त्यांच्या गळ्यातील ३० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटे सुसाट पसार झाले. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अलंकार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणीला गती दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करीत आहेत.

महिलांनो एकटे फिरायला जाउ नका

हिवाळ्यात पहाटे आणि रात्रीच्या सुमारास बहुतांश रस्त्यावर महिला चालण्यासाठी एकटे घराबाहेर पडतात. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांनी काही परिसरात ट्रॅप लावले आहेत. निमर्नुष्य ठिकाणांवर एकट्या महिलांजवळ येउन त्यांच्याकडील सोन्याचा ऐवज हिसकावून नेला जात आहेत. त्यामुळे महिलांनी शक्यतो एकटे घराबाहेर पडू नका. शतपावली करण्यासाठी जात असताना अंगावर सोन्याचे दागिने घालू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक विश्लेषणाद्वारे चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती अलंकार पोलिसांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×