Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पार्टटाईम नोकरीचे आमिष भोवले, तरूणाला १३ लाखांचा गंडा

पार्टटाईम नोकरीचे आमिष भोवले, तरूणाला १३ लाखांचा गंडा

बाणेर पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – पार्टटाईम नोकरी देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्याने तरूणाला तब्बल १३ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २५ ते २६ नोव्हेंबर २०२४ मध्ये बाणेर परिसरात घडली आहे. याप्रकरणी ३० वर्षीय तरूणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आणि टेलीग्रामधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भांडणात मध्यस्थी करणार्‍या तरूणाला बेदम मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण बाणेर परिसरात राहायला असून, २६ नोव्हेंबरला सायबर चोरट्याने टेलीग्रामद्वारे संपर्क साधला. पार्टटाईम नोकरी देण्याच्या आमिषाने टास्क दिला. त्याद्वारे पैसे गुंतवणूक करण्यास सांगून सायबर चोरट्यांनी तरूणाचा विश्वास संपादित केला. त्यानंतर पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने आणि जादा नफा मिळणार या आशेने तरूणाने गुंतवणूकीला सुरवात केली. १३ लाख रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करूनही त्याला नोकरी मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×