Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

भांडणात मध्यस्थी करणार्‍या तरूणाला बेदम मारहाण

कौटुंबिक वादातून मेव्हण्यावर लोखंडी हत्याराने हल्ला

वाघोलीतील घटना, टोळक्याला अटक

marathinews24.com

पुणे – मित्रासोबत सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी करणार्‍या तरूणाला टोळक्याने बेदम मारहाण केली. त्याला शिवीगाळ करीत हातातील दांडके हवेत फिरवून दहशत निर्माण करणार्‍याला टोळक्याला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ११ नोव्हेंबरला संध्याकाळी सातच्या सुमारास वाघोलीतील ओल्डसोल कॅफेसमोर घडली आहे.

ट्रक चालकाने दुचाकीस्वार जेष्ठाला चिरडले – सविस्तर बातमी 

तन्वीर अन्वर शेख (वय २२), प्रताप जयसिंग जगताप (वय २२), नागेश सुनील जगताप (वय २१), सउद कामरान इमरान अरब (वय २१), ओंकार विठ्ठल शिंदे (वय २४, सर्व रा. वाघोली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रोहित वसंतराव गजमल वय २२ याने फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रोहित गजमल याच्या मित्रासोबत टोळक्याने वादविवाद केले होते. त्याचा जाब विचारण्यासह रोहितने भांडणात मध्यस्थी केली होती. त्याच रागातून टोळक्याने रोहितला बेदम मारहाण करीत शिवीगाळ केली. याप्रकरणाची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी टोळक्याला अटक केली आहे. तक्रारदार आणि आरोपी महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×