ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – विसर्जन सोहळ्यात भरधाव ट्रॅक्टर ट्राॅलीच्या धडकेत १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. श्री ज्ञानेश्वर पादुका चौक परिसरात रविवारी (७ सप्टेंबर) दुपारी अपघात झाला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी संदीप शिंदे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
गणपती मूर्ती विक्री स्टॉलवरील २ लाखांची रोकड चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विसर्जन सोहळ्यानंतर रविवारी दुपारी ट्रॅक्टर चालक ट्राॅली घेऊन श्री ज्ञानेश्वर पादुका चौकातून वळून माॅडर्न महाविद्यालयाकडे निघाला होता. त्या वेळी ट्राॅलीच्या चाकाखाली सापडून दीपक गोरक्ष नेटके (वय १४) गंभीर जखमी झाला. अपघातानंतर मुलाला रुग्णालयात दाखल न करता ट्रॅक्टरचालक पसार झाला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला नोटीस बजाविण्यात आली आहे.






















