इमारती-पूल पडतायेहत, कशाची तिसर्‍या क्रमांची अर्थव्यवस्था- उपमुख्यमंत्री अजित पवार

उमद्या नेत्याची - लाडक्या अजित दादांची अकाली exit

निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबद्दल व्यक्त केली नाराजी

marathinews24.com

पुणे – इमारती-पूल पडतायेहत, कशाची तिसर्‍या क्रमांची अर्थव्यवस्था- उपमुख्यमंत्री अजित पवार – ब्रिटिश सरकारने बांधलेल्या विविध उड्डाणपुलांची कामे दर्जेदार होती. ते पूल १०० वर्षांपेक्षाही जास्त कालावधी झाल्यामुळे पाडण्यासाठी तेथून आमच्या पीडब्ल्यूडी विभागाला पत्रव्यवहार केला जातो. अशा प्रकारची कामे सध्या बघायला मिळत नाही. मात्र, दुर्देवाने आता पुल पडतायेत, आम्हालाही कळत नाही कसे काय पडतायेत. पूल पडला-पडला असे टीव्हीवर आम्ही पाहतो. जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था होत असताना आपल्या इमारती, पुल का पडतायेत, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. विविध ठिकाणी होणार्‍या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी 

पीएसइए (प्रोफेशनल स्ट्रकचरल इंजिनिअरर्स असोसिएशनच्या) उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन भांडारकर प्राच्य विद्या संस्थेत केले होते. यावेळी शेषराव कदम प्रशांत वाघमारे, विजय पवार, प्रदीप आपटे, अजय कदम उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोणत्याही ठिकाणच्या इमारती मजबूत झाल्या पाहिजेत. त्याकाळी मजबूत बांधकाम होऊ शकले. आता मात्र, आपण जगात तिसर्‍या क्रमांकावर असलेली अर्थव्यवस्था होत असताना, मग आताच्या काळात आपल्या इमारती, पूल पडतायेत, मग ते लोक हुशार होते का. असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, मावळात पूल पडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता सर्वच ठिकाणच्या पुलांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित संस्थेच्या माध्यमातून भावी इंजिनिअरिंगला दिशा मिळावी, त्यांचे काम संस्थेच्या माध्यमातून होण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. राजकीय जीवनात मी ३५ वर्षात अनेक बांधकामे केली. मी अनेक साखर कारखाने उभे केले आहेत. त्यामध्ये स्ट्रक्चल इंजिनिअरिंगचा मोठा वाटा असल्याचेही पवार यांनी सांगितले.

पुणे हे उद्योगाचे केंद्र असल्यामुळे जगातले विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. पीएसइए संघटनेच्या माध्यमातून प्रभावी योगदान देण्यासाठी आणि नवे पर्व ठरण्यासाठी टाकलेले पाऊल आहे. संघटना स्थापना झाल्यावर १२० जणांनी सदस्य झाले आहेत. ज्ञानाची देवाण घेवाण करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून होईल. सध्या पर्यावरण पूरक वास्तू उभारणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पुण्यात आम्ही अनेक इमारती बांधल्या आहेत. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, शालेय शिक्षण भवन, नोंदणी भवन, जीएसटी भवन, सामाजिक न्याय विभाग, कृषी भवन,महिला बालविकास भवन, अजून अनेक इमारती आम्ही उभा करत आहेत. नवीन राजभवन इमारत बांधकाम करणार असून, यशदाची नवी इमारत करण्यासाठी कामकाज सुरू केल्याचे पवार यांनी सांगितले.

सचिव अजय कदम म्हणाले, काळानुसार मोठमोठ्या इमारती, ब्रीज उभारले जात आहेत. पूर्वी स्ट्रक्चल इंजिनियर बाबत फारशी माहिती लोकांना नव्हती. आता फार मोठे बदल झाले आहेत. संघटना स्थापन झाल्यामुळे अनेकदा फायदा होणार आहे. चेअरमन शेषराव कदम म्हणाले, स्टक्चरल इंजिनिअरिंग करताना अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो. आमच्यावर जबाबदारी आहे. मात्र अधिकार काही नसल्याची खंत व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×