Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

अंबाजोगाईत घरफोडी; ११ लाखांचा ऐवज चोरीला

ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीला

घटनेने परिसरात खळबळ

marathinews24.com

बीड – अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ परिसरातील बाराभाई गल्ली येथील व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी ११ लाखांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे घडलेल्या या धाडसी घरफोडीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबार; पुण्यातून ५ हल्लेखोरांना अटक – सविस्तर बातमी

घराचे कुलूप तोडून आत शिरलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ११ लाख ७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. घरफोडीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सीसीटीव्हीच्या आधारेच घरमालक मोहम्मद अलीमुद्दीन कारीमुद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. मोहम्मद अलीमुद्दीन यांचा किराणा मालाचा व्यवसाय असून ते आपल्या कुटुंबासह एपीजे अब्दुल कलाम शादीखाना शेजारी त्यांचे घर असून दि. २८ जानेवारी रोजी सकाळी आपल्या घराला कुलूप लाऊन ते आपल्या कुटुंबासह पाथरी येथे त्यांच्या मुलाच्या घराचे चालू असलेले बांधकाम पाहण्यासाठी गेले होते. घराला लावलेले कुलूप पाहून व त्यावर पाळत ठेवून चोरट्यांनी २९ जानेवारीच्या मध्यरात्री १:२५ वाजेच्या सुमारास दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला.घरात प्रवेश करून त्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम यावर डल्ला मारून त्यांनी पोबारा केला. दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांच्या दुकानातील कामगाराने घर उघडे असल्याचे फोनवरून कळवले.

त्यानंतर मोहम्मद अलीमुद्दीन हे घरी आल्यानंतर त्यांना आपली घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी घरातील कपाटे फोडून सोन्याचे गंठण, नेकलेस, अंगठ्या, बांगड्या आणि चेन असे सुमारे ८ लाख ७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच कपाटात ठेवलेली ४ लाख रुपयांची रोकडही चोरून नेली. घर मालकाच्या तक्रारी वरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळा जावून तेथील घडलेल्या घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×