बाणेर, चंदननगर भागात घरफोडी

Pune Crime

बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – शहरातील बाणेर, चंदननगर परिसरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा ३ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. बाणेर भागातील वीरभद्रनगर परिसरात असलेल्या बैठ्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण मंगळवारी (८ सप्टेंबर) सकाळी अकराच्या सुमारास घर बंद करुन बाहेर गेला होता. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी कपाटातील ३ लाख रुपयांचे दागिने लांबविले. दुपारी एकच्या सुमारास तरुण घरी परतला. तेव्हा घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

पुण्यात आमदाराच्या पोलीस गार्डला धक्काबुक्कीची चर्चा – सविस्तर बातमी 

चंदननगर परिसरात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील १८ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार खराडी रस्त्यावरील शेजवळ पार्क भागात राहायला आहेत. मंगळवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ते घर बंद करून बाहेर गेले होते. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले. कपाटातील १८ हजारांची रोकड चोरून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक अस्वले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×