पुण्यात मेट्रो स्थानकाच्या खांबावर बस धडकली

वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

marathinews24.com

पुणे – मेट्रो स्थानकाच्या खांबाला खासगी आराम बसने धडक दिली. त्यावेळी पाठीमागून येणारा ट्रक बसवर आदळल्याने आरबीआय मेट्रो स्थानक परिसरातील एक मार्गिका वाहतुकीस बंद करण्यात आली असून, वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले.

बोपदेव घाटातील लॉजवर छापा; बांगलादेशी तरुणी ताब्यात – सविस्तर बातमी

‘शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम प्रगतीपथावर असून, मेट्रो स्थानक उभारण्याचे काम सुरू आहे. आरबीआय मेट्रो स्थानकाच्या खांबावर मध्यरात्री आराम बस आदळली. त्यावेळी तेथून निघालेला ट्रक बसवर पाठीमागून आदळला. अपघातामुळे एक मार्गिका बंद झाली असून, अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. या भागात कोंडी व्हायची शक्यता असल्याने वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले.

चतु:शृंगी वाहतूक विभागातील राधा चौक, पिंपरी-चिंचवडकडून शिवाजीनगरकडे येणाऱ्या वाहनचालकांनी ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून खडकी भुयारी मार्गातून शिवाजीनगरकडे जावे. बाणेरकडू शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी अबिल हाऊस येथून डावीकडे वळून रेंज हिल्समार्गे इच्छितस्थळी जावे. काॅसमाॅस बँकेसमोरील चौकातून वळून सेनापती बापट रस्त्याने जावे, असे चतु:शृंगी वाहतूक विभागतील पोलीस उपनिरीक्षक सचिन खेतमाळस यांनी सांगितले. कार्यालयीन कामकाजाचा पहिला दिवस असल्याने या भागात कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

वेधशाळा चौकात झाड कोसळले

शिवाजीनगर भागातील वेधशाळा चौकात झाड कोसळल्याची घटना मध्यरात्री घडली. या घटनेची माहिती अग्निशमन दलातील अधिकारी कमलेश चौधरी आणि जवानांनी झाडाच्या फांद्या हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×