कुख्यात नीलेश घायवळच्या घरातून काडतुसे जप्त

कुख्यात नीलेश घायवळच्या घरातून काडतुसे जप्त

घायवळविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर परदेशात पसार झालेला गुंड नीलेश घायवळ याच्या घरातून पोलिसांनी दोन काडतुसे, तसेच चार पुंगळ्या जप्त केल्या. याप्रकरणी घायवळविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शस्त्र अधिनियम १९५१ चे कलम ५, ७, २५ (१), २७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळशीबागेत महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी 

घायवळच्या घराची झडती कोथरूड पोलिसांनी शनिवारी (दि.४)घेतली. श्री संत ज्ञानेश्वर काॅलनीतील घायवळच्या घरी पोलिसांचे पथक पोहोचले. त्याच्या घरातील कपाटातून दोन काडतुसे आणि चार पुंगळ्या जप्त करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पटारे, कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक नेमाणे तपास करत आहेत.

कोथरूड गोळीबार प्रकरणात घायवळ, तसेच साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली. गोळीबार प्रकरणात मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक यांना अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळवले. तो स्वित्झर्लंडमध्ये पसार झाला. घायवळला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीस बजाविली आहे. घायवळने स्वतःच्या आडनावात फेरफार करून पारपत्र मिळविल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव त्याने पारपत्र मिळवताना वापरले आहे. त्याला पारपत्र मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

घायवळ, तसेच त्याच्या कुटुंबीयांचे आर्थिक स्रोत पोलिसांनी तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार घायवळ, त्याच्या कुटुंबीयांची दहा बँक खाती गोठविण्याबाबत पोलिसांनी बँकेशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर बँकेकडून नीलेश घायवळ, शुभांगी घायवळ, स्वाती नीलेश घायवळ, कुसुम घायवळ आणि पृथ्वीराज एंटरप्रायझेस ही बँक खाती गोठविण्यात आली आहे. दहा बँक खात्यांतील ३८ लाख २६ हजार रुपये आढळून आले आहेत. पुणे पोलिसांच्या परवानगीशिवाय या बँक खात्यातून व्यवहार करता येणार नाहीत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×