चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून ९० हजारांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्येष्ठाकडील दोन लाखांची सोनसाखळी चोरी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात राहायला आहेत. त्या शनिवारी (४ ऑक्टोबर) दुपारी चारच्या सुमारास तुळशीबागेत खरेदीसाठी आल्या होत्या. हुतात्मा बाबू गेणू चौकातून त्या तुळशीबागेकडे जात असताना चोरट्याने गर्दीत त्यांच्या पिशवीची चेन उघडून ९० हजारांचे दागिने लांबविले. दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार सुरवसे तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या पिशवीतून दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.





















