Breking News
खारघर येथे ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाची जय्यत तयारीपुण्यातील वेश्या व्यावसाय प्रकरणात गुन्‍हे दाखलशासकीय योजनांचा व कायदेविषयक सेवांचा महामेळाव्याचे खेड-राजगुरूनगर येथे आयोजनरस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना; नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व परवाना रद्द- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी“चला… चला काश्मीर!” – पुणेकरांना काश्मीर आयकॉनचे भावनिक आवाहनमुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावाउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्नपुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रध्दांजलीशासकीय तंत्रनिकेतनचा पदविका प्रदान समारंभ संपन्नमद्यधुंद चालकाच्या धडकेत डिलेव्हरी बॉयचा मृत्‍यू

शिस्तबद्धपणे गणेशोत्सव उत्साहात साजरा करा – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

शिस्तबद्धपणे गणेशोत्सव उत्साहात साजरा करा - पोलीस आयुक्त अमितेश कुमार

मंडळांनी नियमांचे पालन करुन गणेशोत्सव शिस्तबद्धपणे उत्साहात साजरा करावा

marathinews24.com

पुणे – ‘गणेश मंडळांच्या पाठीशी पोलीस आहेत. मंडळांनी नियमांचे पालन करुन गणेशोत्सव शिस्तबद्धपणे उत्साहात साजरा करावा’, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी केले. पुणे पोलीस आणि विघ्नहर्ता न्यासाकडून आदर्श गणेशोत्सव स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात पार पडला. या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते.

अँड. प्रकाश आंबेडकर यांचा भव्य नागरी सत्कार होणार – सविस्तर बातमी 

स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या मंडळांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, डाॅ. मिलिंद भोई, उदय जगताप, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, मनोज पाटील, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले, मिलिंद माेहिते, संभाजी कदम, सोमय मुंडे, डाॅ. राजकुमार शिंदे, वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव या वेळी उपस्थित होते.

‘विसर्जन मिरवणुकीतील सहभागावरून सुरू असलेला वाद मिटला आहे. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वयाचा मार्ग काढण्यात आला आहे. गणेशोत्सवाला राज्यउत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. मंडळांना काही अडचण जाणवित असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधवा. मंडळांना विविध प्रकारच्या परवानगी एकाच ठिकाणी मिळणार आहे. मंडळांच्या पाठीशी पोलीस आहेत. नियमांचे पालन करुन उत्सव शिस्तबद्धपणे साजरा करावा’, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.

‘उत्सवाच्या काळात परगाावाहून मोठ्या संख्येने भाविक येतात. भाविकांचे सुरक्षा विचारात घेऊन बंदोबस्ताची आखणी करण्यात आली. मंडळांनी मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. हे कॅमेरे मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार आहे. त्यादृष्ठीने पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मंडळांकडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. वर्षभर विविध उपक्रम राबविणारे मंडळ आणि पदाधिकरी कौतुकास पात्र आहेत,’ असे त्यांनी नमूद केले. पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले यांनी प्रास्ताविक केले. उपायु्क्त हिंमत जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×