बारामती येथे मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

बारामती येथे मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बदल

marathinews24.com

पुणे – बारामती येथे 2 नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित होणाऱ्‍या बारामती स्पोटर्स फाऊंडेशन मॅरेथॉन कालावधी मॅरेथॉन स्पर्धा सुरळीत पार पडावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ११५ नुसार तसेच शासन गृह विभागाच्या दि. १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार 2 नोव्हेंबर २०२५ रोजी वाहतूक बंद व पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याचे आदेश जारी केले आहेत.

पुण्यात पहिली व्हिझकिड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात – सविस्तर बातमी 

या आदेशानुसार 2 नोव्हेंबर रोजी पहाटे ३.०० वाजेपासून ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत किंवा मॅरेथॉन संपेपर्यंत बारामती शहरातील खालील मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.

स्पर्धेचा मार्ग : रेल्वे स्टेशन ग्राउंड – पंचायत समिती चौक – सम्यक चौक – श्रीरामनगर चौक – उर्जाभवन चौक – अभिषेक चौक – सी.टी.एन. चौक – पेन्सील चौक – विमानतळ रोड – कल्याणी कॉर्नर – भारत फोर्स – फेरेरो कंपनी मुख्य प्रवेशद्वार – कटफळ रेल्वे स्थानक येथून यु-टर्न घेऊन परत फेरेरो कंपनी – पियाजो कंपनी – हॉटेल अक्षरा चौक – अग्निशमन केंद्र चौक – कल्याणी कॉर्नर – मेडिकल कॉलेज चौक – पेन्सील चौक – सी.टी.एन. चौक – हॉटेल अभिषेक चौक – उर्जाभवन चौक – श्रीरामनगर चौक – सम्यक चौक – कोर्ट कॉर्नर – पंचायत समिती चौक – भिगवण रोडमार्गे रेल्वे ग्राउंड येथे समाप्त होणार आहे.

वाहतूक वळविण्याचे पर्यायी मार्ग

भिगवणकडे जाणारी वाहतूक: तीन हत्ती चौक – माळवरची देवी – जळोची – संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग किंवा विद्या प्रतिष्ठान मागील मार्गाने ग.दि.मा. सभागृह – अभिषेक कॉर्नर – रुई पाटी – भिगवण रोड.

भिगवणकडून बारामतीकडे येणारी वाहतूक: रुई पाटी – ग.दि.मा. कॉर्नर – अभिषेक कॉर्नर – जळोची – माळवरची देवी – मोतीबाग – इंदापूर रोड किंवा वंजारवाडी येथील स्व. गोपीनाथ मुंडे चौक – पालखी महामार्ग – जळोची मार्गे – इंदापूर रोड मार्गे वळविण्यात येत आहे.

पाटस रोड (देशमुख चौक) कडून येणारी वाहतूक: रेल्वे ब्रीज उतरल्यानंतर यु-टर्न घेऊन रेल्वे रुळाच्या बाजूने मेहता हॉस्पिटल – महिला हॉस्पिटल मार्गे एम आय डी सीकडे वळविण्यात येत आहे.

पाटस रोड पालखी महामार्गाकडून एम आय डी सीकडे जाणारी वाहतूक: विमानतळाच्या बाजूचा पालखी मार्ग – रेल्वे सर्कल – नवीन पालखी मार्ग अशी वळविण्यात येत आहे.

भिगवण रोडकडून पाटसकडे जाणारी वाहतूक: नवीन पालखी मार्ग – रेल्वे सर्कल – चारपदरी पालखी मार्गाने पाटस रोडकडेवळविण्यात येत आहे.

तीन हत्ती चौक ते पेन्सील चौक ते मेडिकल हॉस्पिटल असा मुख्य मार्ग वाहतुकीस बंद राहील. या मार्गावरील रहिवाशांसाठी दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडने वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मेडिकल कॉलेज चौक ते फेरेरो कंपनी मुख्य प्रवेशद्वारापर्यंत असा पियाजो कंपनीकडील मार्ग वाहतूक बंद राहील. नागरिकांनी मॅरेथॉन कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×