Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत बालकाचा मृत्यू

Tractor Accident

आई गंभीर जखमी; चालकासह शाळेच्या संस्थापकाविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत पाच वर्षांचा बालकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात घडली. अपघातात बालकाची आई गंभीर जखमी झाली. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसंनी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस चालकाला अटक केली आहे. मोडक इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक, मुख्याध्यापकासह चौघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. साईनाथ तुळशीराम भंगारे (वय ५) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.

पुण्यातील लष्कर भागात थरार; मद्यधुंद मोटारचालक ताब्यात – सविस्तर बातमी

अपघातात साईनाथची आई रेखा तुळशीराम भंगारे (वय २८,रा. गणराज हाईट्स, सावली होम सोसायटीजवळ, उरूळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) गंभीर जखमी झाल्या आहेत. रेखा यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालक संस्कार अनिल भोसले (रा. पांडवनगर, वडकी, हडपसर सासवड रस्ता) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे भोसले याला अटक करण्यात आली आहे. मोडक इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक संजय वसंत मोडक, मुख्याध्यापक डाॅ. आरती जाधव, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या मालक मनीषा संजय मोडक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ ऊरळी देवाची परिसरातील एका शाळेत शिशूगटात होता. मंगळवारी (२ नोव्हेंबर) सकाळी साडे सातच्या सुमारास रेखा मुलाला घेऊन शाळेत सोडण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी धनगरवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसने रेखा आणि साईनाथ यांना धडक दिली. साईनाथ बसच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला. बसच्या धडकेत रेखा जखमी झाल्या.

अपघातानंतर साईनाथ आणि रेखा यांना नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच साईनाथ याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेश खांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक किशोर पवार तपास करत आहेत.

संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी साईनाथचा मृतदेह पोलीस ठाण्यात नेला. फुरसुंगी भागातील एका शाळेची ही बस असल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांना शाळेचे प्रशासन, संस्था चालक, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नातेवाईकांच्या आक्रोशामुळे परिसरात शोककळा पसरली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×