Breking News
Savitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हे

वीज प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करा-ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी घेतला वीज प्रकल्पाचा आढावा

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील वाढत्या वीज गरजांची पूर्तता करण्यासाठी सुरु असलेले प्रकल्प कालबद्ध कार्यक्रम राबवून विहित मुदतीत पूर्ण करावे, ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करून त्यांना स्थिर, गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा करण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी बैठकीत दिले.

पूरग्रस्तांना मदत करा- उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) येथे आयोजित बैठकीत पुणे जिल्ह्यातील वाढत्या वीज गरजांची पूर्तता करण्यासाठी चालू, प्रलंबित आणि प्रस्तावित प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी महावितरणचे विभागीय संचालक भुजंग खंदारे, पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे, बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोळप, महानिर्मितीचे मुख्य अभियंता संजय कुऱ्हाडे उपस्थित होते.

साकोरे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य उद्योगपुरक राज्य असल्याने विविध प्रकल्पात गुंतवणूक होत आहे, पुणे व पिंपरी चिंचवडमधील उद्योगधंद्यांचा विचार करता त्यांना लागणारी वीज उपलब्ध करुन दिली पाहिजे, उद्योग उभे करतांना अडचण येता कामा नये. उद्योगधंदे, नागरिकांना मुबलब प्रमाणात वीज मिळेल, प्रकल्प सुरु करण्यापूर्वी आगामी 30 वर्षाचा विचार करुन प्रकल्पाचे नियोजन करावे. वीज खंडीत होणार नाही तसेच कामे प्रलंबित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

प्रकल्पाची कामे करतांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्याकरिता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेटी देवून संबंधितांशी चर्चा करुन मार्ग काढावा. प्रकल्पाच्या कामाचे दैंनदिन संनियंत्रण करावे. शहरातील जागेबाबत प्रलंबित विषय मार्गी लावण्याकरीता सतत पाठपुरावा केला पाहिजे. मंजूर कामे सुरु करुन वेळेत पूर्ण झाले पाहिजे. महापरेषणकडून कागदपत्र व प्रस्ताव मंजूरी जलद गतीने करावी. विजेची वाढत्या मागणी, नवे प्रकल्प उभारणीबाबतची स्थिती, ग्रीड क्षमता वाढविण्याचे नियोजन, नवीकरणीय ऊर्जेच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा कराव्यात, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती साकोरे यांनी दिले. यावेळी कोळप आणि कुऱ्हाडे यांनी पुणे जिल्ह्यातील सुरु असलेले चालू, प्रलंबित आणि प्रस्तावित वीज प्रकल्पांबाबत पीपीटीद्वारे माहिती दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×