चोरट्यांविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Crime News : पादचारी ज्येष्ठ महिलेकडील दागिने आणि रोकड ठेवलेली पर्स दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना नीलायम चित्रपटगृहासमोर घडली. याप्रकरणी पसार झालेल्या चोरट्यांविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्येष्ठ महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात ट्रकच्या धडकेत महाविद्यायीन युवतीचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला नीलायम चित्रपटगृह परिसरात एका सोसायटीत राहायला आहेत. त्या गुरुवारी (२६ जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नीलायम चित्रपटगृहासमोरील गल्लीतून निघाल्या होत्या. त्यांच्या पिशवीत दागिने आणि रोकड असा ८५ हजार रुपयांचा ऐवज होता. चोरट्यांनी महिलेकडील पर्स हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत. शहर परिसरात पादचारी महिलांकडील दागिने, तसेच मोबाइल हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
फ्लॅटमधून साडेचार लाखांचा ऐवज लांबविल
Crime News : फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड ४ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना नाना पेठेतील पद्मजी पार्क परिसरात घडली.
याबाबत ज्येष्ठ महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला पद्मजी पार्क परिसरातील दुर्गानिवास सोसायटीत राहायला आहेत. बुधवारी (२५ जून) दुपारी त्या सदनिका बंद करुन बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्या परतल्या. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून रोकड, सोन्याचे दागिने असा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे तपास करत आहेत.