Breking News
कोथरूडमध्ये ‘संन्यस्त खडग’ नाटक वंचित बहुजन आघाडीकडून बंदबीडीपी आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलावित – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेशहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाडराज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्तमातंग समाजाच्या स्वागताध्यक्षपदी लक्ष्मीताई पवार…एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांची फसवणूकCrime News : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून एकाचा खूनCrime News : बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावलेबाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

Accident News : पुण्यात ट्रकच्या धडकेत महाविद्यायीन युवतीचा मृत्यू

Crime News

सिंहगड रस्ता भागातील घटना

marathinews24.com

पुणेAccident News : भगधाव ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील तुकाईनगर परिसरात घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सई श्रीकांत भागवत (वय १९ ,रा. भन्साळी कॅम्पस, तुकाईनगर, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महाविद्यालयीन युवतीचा नावे आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपश्री श्रीकांत भागवत (वय ४८) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शादी डॉटकॉमद्वारे केली ३ कोटी ६० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सई स. प. महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षात होती. गुरुवारी (२६ जून) दुपारी ती दुचाकीवरुन घरी निघाली होाती. सिंहगड रस्ता भागातील तुकाईनगर परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार सईला धडक दिली. अपघतात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. अपघातानंर ट्रकचालक पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहेत. पोलीस उपनिरीक्षक कांजळे तपास करत आहेत.शहर परिसरातील प्रमुख रस्त्यांवर डंपर, सिमेट मिक्सर, ट्रक अशा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. आदेश धुडकाविणाऱ्या अवजड वाहनांविरुद्ध पोलिसंनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. परिसरात गंभीर अघघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अवजड वाहनांच्या वेगामुळे गंभीर अपघात घडले आहे.

भरधाव डंपरच्या धडकेत संगणक अभियंता दुचाकीस्वार तरुणी मृत्युमुखी पडल्याची घटना बाणेर परिसरात १९ जून रोजी घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी जखमी झाली. मे महिन्यात लोहगाव परिसरात महाविद्यालयीन दुचाकीस्वार युवतीचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला होता. वडगाव उड्डाणपुलावर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणी मृत्युमुखी पडल्याची घटना बाणेर परिसरात घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी जखमी झाली. शहर परिसरात गेल्या महिन्याभरात वेगवेगळ्या भागात १७ जणांचा अपघाती मृत्यू झाला. भरधाव अवजड वाहनचालकांच्या बेदकारपणामुळे शहरात गंभीर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

टेम्पोच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

पुणे – Accident News : टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना खडकीतील सर्वत्र विहार भागात घडली. आईजा शेख असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. याबाबत तिची आई झेबा शाहिन जाहिद शेख (वय २५, रा. सर्वत्र विहार, एम. ई. एस. काॅलनी, लेबर कॅम्पसमोरील रस्ता, खडकी) हिने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२६ 1जून) दुपारी बाराच्या सुमारास आईजा शेख ही घरासमोर खेळत होती. त्या वेळी तेथून निघालेल्या भरधाव टेम्पोच्या धडकेत तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पाेचालकाचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक पटेल तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top