Breking News
Savitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हे

Crime News : सराफी पेढीचा दरवाजा उचकटून दीड लाखांचे दागिने चोरीला

Munition India CBI Case

वानवडीतील घटना

marathinews24.com

पुणे –  Crime News : सराफी पेढीचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना वानवडीतील साळुंखे विहार रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत सराफी पेढीचे मालक जगदीश सोनी (वय ५३, रा. रिगालो सोसायटी, बिशप स्कूलजवळ, उंड्री) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलीस छाप्यात कारवाई – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांची साळुंखे विहार रस्त्यावरील स्पेस काॅर्नर इमारतीत रतन ज्वेलर्स ही सराफी पेढी आहे. चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री सराफी पेढीचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. पेढीतील शोकेसमध्ये ठेवलेले एक लाख ५३ हजार रुपयांचे दागिने चोरून चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरटयांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे तपास करत आहेत.

कोंढव्यात फ्लॅटचे कुलूप तोडून ऐवज लंपास

Crime News : फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ४६ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. शोएब शेख (वय ३६, रा. साईबाबानगर, कोंढवा) यांनी याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेख कुटुंबीय सोमवारी (७ जुलै ) दुपारी साडेबाराच्या सुमारास सदनिका बंद करुन बाहेर गेले होते. चोरट्यांनी शेख यांच्या सदनिकेचे कुलूप चोरट्यांनी आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाट उचकटून २ लाख ४६ हजारांचे सोन्याचे दाागिने लांबवून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव तपास करत आहेत.

आंबेगाव पठारमध्ये एकाच सोसायटीतील दोन फ्लॅट फोडले

Crime News : भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव पठार परिसरात एकाच सोसायटीतील दोन फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत गणेश आढाव (वय ४०, रा. जिजामाता चौक, आंबेगाव पठार ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी आढाव यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून १० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लांबविले, तसेच त्याच सोसायटीत राहणाऱ्या लक्ष्मी राठोड यांच्याच सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने लांबविले. चोरट्यांनी एकूण मिळून १ लाख १० हजारांचा ऐवज लांबविल्याचे आढाव यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×