Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

दिवसा घरफोडी करणारी टोळी जेरबंद; ९ गुन्हे उघडकीस

दिवसा घरफोडी करणारी टोळी जेरबंद; ९ गुन्हे उघडकीस

वाघोली पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – दिवसा घरफोडी करणारी टोळी जेरबंद; ९ गुन्हे उघडकीस – दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा वाघोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपींकडून ३७ ग्रॅम सोने, ७४० ग्रॅम चांदी, रोकड दुचाकी असा तब्बल ४ लाख ३३ हजार २२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींमध्ये घरफोडी करणाऱ्यांसह चोरीचे सोने-चांदी वितळवणारे आणि खरेदी करणाऱ्या अशा चौघांचा समावेश आहे.

पुण्यात उच्चपदस्थ महिला अधिकार्‍याचे अंघोळीचे व्हिडिओ केले रेकॉर्ड – सविस्तर बातमी 

सचिन भिमराव पाटील (वय ३५, रा. साई पार्क, ढवळे रेसिडेन्सी) राजु मल्लाप्पा नायकवडे ( वय २९, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) श्रीवंत उत्तमराव काटकर (वय ३५, रा. सराफ आळी, उरुळी कांचन) घनशाम रामरतन वर्मा (वय ४८, रा. ससाणेनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन आणि राजू यांनी वाघोली, हडपसर परिसरात दिवसा घरफोड्या केली होती. चोरीचे दागिने श्रीवंत काटकर याला विकले होते. काटकरने ते दागिने वितळवून लगड केली. त्यानंतर सोन्याची लगड आरोपी घनशाम वर्मा या सोनाराकडे विकली होती. पथकाने गुन्ह्यांचा उलगडा

करून वाघोली आणि हडपसर पोलीस ठाण्यांतील ९ घरफोड्यांची उकल केली आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार समीर भोरडे, पांडुरंग माने, रमेश साबळे, बाबासाहेब मोराळे, प्रदीप मोटे यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×