एकविरा माता देवी मंदिराच्या सोयसुविधेचा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतला आढावा

एकविरा माता देवी मंदिराच्या सोयसुविधेचा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतला आढावा

एकविरा माता देवी मंदिराच्या पायथ्याशी सभा मंडपाकरिता १५ लाख रुपये देण्याची घोषणा

marathinews24.com

पुणे – एकविरा देवी मंदिराच्या पायथ्याशी भाविकांसाठी सभा मंडप उभारण्यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या आमदार निधीतून १५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘नाहरकत प्रमाणपत्र’ मिळताच सभा मंडपाचे काम तातडीने सुरु करण्यात येईल, असे एकविरा मातेचे दर्शन घेतल्यानंतर परिसरातील सोईसुविधाची पाहणीदरम्यान डॉ. गोरे यांनी सांगितले.

‘साहित्य रंग’ भाग – २५, प्रेक्षकांच्या भेटीला; एक महत्त्वाचा टप्पा – सविस्तर बातमी 

डॉ. गोरे यांनी म्हणाल्या, मावळ तालुक्यातील कार्ला परिसरातील प्राचीन आणि पवित्र एकविरा माता मंदिर असून ते महाराष्ट्रातील महत्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधा आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. गोऱ्हे यांनी दिली.

या परिसरात येणाऱ्या भाविकांकरिता वाहनतळ, खड्डेमय रस्ते आणि भाविकांच्या सोयीशी निगडित विविध कामे अद्यापही प्रलंबित आहेत. पीएमआरडीए व एमएमआरडीएच्यावतीने कामे करण्यात येत असून दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय साधून ही कामे वेगाने पूर्ण होणे आवश्यक आहे. याबाबत दिवाळीनंतर विधानभवनात विशेष बैठक घेऊन संबंधित विभागांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यात येईल; या परिसरातील प्रलंबित कामे गतीने पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल, असेही डॉ. गोरे म्हणाल्या.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानाच्या तयारीचा घेतला आढावा

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानाच्यावतीने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. पायरी मार्गावर रेलिंग बसविणे, मधमाशांच्या हल्ल्यापासून संरक्षण, लाकडी डोलीतून दर्शन घेणाऱ्या भक्तांची सुरक्षितता, आरोग्यसेवा सुविधा आणि पार्किंग समस्येचे निराकरण यावर विशेष भर देण्यात आला. “भाविकांची सुरक्षितता आणि सोय ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे, त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व कामे करण्यात येतील, असेही डॉ. गोरे म्हणाल्या. यावेळी परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×